Wednesday, October 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूजआमदार खोसकरांना उमेदवारी कायम राखण्यासाठी आतापासूनच करावी लागतेय नेत्यांची मनधरणी

आमदार खोसकरांना उमेदवारी कायम राखण्यासाठी आतापासूनच करावी लागतेय नेत्यांची मनधरणी

प्रदेशाध्यक्षांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास थेट भंडाऱ्यात लावली हजेरी

नाशिक | Nashik

आगामी विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. तर विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी (Candidate) आपल्या पद्धतीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले काँग्रेसचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकरांना (Hiraman Khoskar) आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मनधरणी करावी लागत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Mahavikas Agahdi Protest:’महाराष्ट्रद्रोह्यांना ‘गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय थांबू नका’; उद्धव ठाकरेंचा घणाघात

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची आमदार खोसकरांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत संगमनेर येथे भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खोसकरांना उमेदवारी द्यावी अशी मागणी थोरात यांच्याकडे केली होती. त्यानंतर काल आमदार खोसकरांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडाऱ्यातील चारभट्टी येथील श्रावणमास समाप्ती आणि हनुमान चालीसा पठण कार्यक्रमास हजेरी लावली. त्यामुळे खोसकरांना एकप्रकारे पुन्हा आपली उमेदवारी कायम राखण्यासाठी नेत्यांकडे आतापासूनच फिल्डिंग लावावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Weather Update : राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

यावेळी बोलतांना खोसकर म्हणाले की, नाना पटोले (Nana Patole) यांचा निरोप मला मिळाला होता. त्यामुळेच मी भंडारा (Bhandara) येथील त्यांच्या श्रावणमास समाप्तीच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मला शंभर टक्के खात्री आहे की, पक्षश्रेष्ठी माझ्यावर विश्वास ठेवतील आणि मलाचं उमेदवारी देतील. नाना पटोलेंनी त्यांच्या भाषणातून नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नेहमी दर्शनाला जातात. आता भंडाऱ्याच्या चारभट्टी मंदिरात दर्शनाला या, असे वक्तव्य केले. हे माझ्या निवडणुकीच्या दृष्टीने मला उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. पक्षाने मला उमेदवारी दिल्यास मी माझ्या प्रचाराचा नारळ भंडाऱ्याच्या चारभट्टी मंदिरातून फोडेल, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : लासलगाव कृउबा समितीच्या माजी संचालकाचा आढळला मृतदेह; घातपाताचा संशय व्यक्त
तसेच लोकांच्या प्रत्येक सुख दुःखात मी सहभागी होत असतो, त्यामुळे माझी या निवडणुकीसाठी तयारी सुरू झालेली असून गेल्या पाच वर्षात मी सातत्याने मतदारसंघात कामांचा सपाटा लावला आहे. विधानपरिषद निवडणुकीत (Vidhanparishad Election) क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप माझ्यावर कसा लावला याची मला कल्पना नाही. मात्र, पक्षांने सांगितलेल्या उमेदवारांलाच मी मतदान केले, असा पुनरुच्चारही यावेळी खोसकरांनी केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या