सुरगाणा | वार्ताहर | Surgana
तालुक्यातील आंबाठा शिवारात (Ambatha Shivar) शनिवार (दि.१९) रोजी भास्कर सुकर पवार यांच्या फॉरेस्ट प्लाटमध्ये पायरीच्या फांदीला ओढणीच्या सहय्य्याने कुजलेल्या (Decomposed) अवस्थेत एका महिलेचा (Woman) मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाठा येथील पोलीस पाटील शिवाजी वाघमारे यांना मृतदेह (Dead Body) आढळल्याची खबर मिळताच त्यांनी सुरगाणा पोलीसाना कळवले. त्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दंवगे, अंबादास बैरागी यानी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी घटनेच्या ठिकाणी अनोळखी महिलेचा मृतदेह वय (अंदाजे २० ते २५ वर्ष) आढळून आला.
दरम्यान, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरगाणा पोलीस (Surgana Police) करत आहेत. तसेच मयत महिलेबाबत कुणाला माहिती मिळाल्यास सुरगाणा पोलीस निरीक्षक समाधान नागरे मो.९७६७८११३२१, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दंवगे मो.९८२३ ४२१२५१ आणि अंबादास बैरागी यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनोळखी मयत महिलेचे वर्णन
अंगावर काळ्या रंगाचा टाॅप लेगीज फिकट खाकी रंगाची, उजव्या हाताला काळ्या पांढऱ्या रंगाचे मणी, असलेले ब्रेसलेट ओढणी, आकाशी रंगाची पांढरे ठिपके असलेली, डोक्यावर केस गळून पडलेली, उंची अंदाजे साडे चार ते पाच फूट शरीर बांधा मध्यम वय अंदाजे २० ते २५ असे आहे.




