पंचवटी |प्रतिनिधी | Panchvati
बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प हाती घेत संगमनेर येथे वास्तव्यास असलेले योगी भूतनाथ महाराज महादेवाच्या भक्तीची अनोखी वाटचाल करीत आहेत. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी नाशिकहून (Nashik) मार्गस्थ झाले आहेत.
दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त योगी भूतनाथ महाराज (Yogi Bhutnath Maharaj) रामकुंड परिसरात दाखल झाले असता त्यांच्या आगळ्यावेगळ्या रूपाने नागरिक व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. अंगावर भस्म, वाढलेल्या जटा, हातात कवटी आणि महादेवाच्या भक्तीचे प्रतीक असलेला वेश यामुळे ते भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. विशेष म्हणजे, त्यांनी तयार केलेल्या वाहनावर “जीना है तो शिवाजी जैसा जियो, मरना है तो संभाजी राजे जैसा मरो” असा प्रेरणादायी संदेश लिहिलेला आहे.
हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी; पालकमंत्री गिरीश महाजनांनी केला एसटीने प्रवास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याने जगावे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम व त्यागातून प्रेरणा घेऊन जीवन जगावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. वाहनावर असलेल्या या संदेशाकडेही रामकुंड परिसरातील (Ramkund Area) नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले. योगी भूतनाथ महाराजांनी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला असून, उज्जैन येथील महाकालेश्वराच्या दर्शनानंतर आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी ते नाशिकमध्ये आले आहेत. श्रावणातील पवित्र सोमवारी रामकुंड परिसरात त्यांच्या अनोख्या रूपासह त्यांच्या वाहनावरील संदेशाचीही भाविकांमध्ये चर्चा रंगली.




