Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik NMC Election : तिसर्‍या दिवशी ५९० इच्छुकांनी नेले १,१४८ उमेदवारी अर्ज;...

Nashik NMC Election : तिसर्‍या दिवशी ५९० इच्छुकांनी नेले १,१४८ उमेदवारी अर्ज; कोणत्या विभागात किती?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Nashik Municipal Corporation Elections) उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शुक्रवारी (दि. २६) तिसऱ्या दिवशी एकूण १२२ जागांसाठी ५९० इच्छुकांनी तब्बल १,१४८ नामनिर्देशन अर्ज खरेदी केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यामुळे महापालिका निवडणूक (Election) अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

- Advertisement -

आज प्रभाग क्रमांक १ मध्ये २० इच्छुकांनी ३६ अर्ज नेले आहे, तर प्रभाग २ मध्ये ५३, प्रभाग ३ मध्ये १८, प्रभाग ४ मध्ये ३६, प्रभाग ५ मध्ये १४, प्रभाग ६ मध्ये १५, प्रभाग ७मध्ये ४८, प्रभाग ८ मध्ये ३२, प्रभाग ९ मध्ये २९, प्रभाग १० मध्ये ४०, प्रभाग ११ मध्ये ३६, प्रभाग १२ मध्ये ३७, प्रभाग १३ मध्ये ५६, प्रभाग १४ मध्ये ५९, प्रभाग १५ मध्ये १९, प्रभाग १६ ५५, प्रभाग १७ मध्ये ६२, प्रभाग १८ मध्ये ४७, प्रभाग १९ मध्ये ४९, प्रभाग २० मध्ये ५१, प्रभाग २१ मध्ये ४८, प्रभाग २२ मध्ये ३२, प्रभाग २३ मध्ये ३३, प्रभाग २४ मध्ये ५४, प्रभाग २५ मध्ये २३, प्रभाग २६ मध्ये ३९, प्रभाग २७ मध्ये २६, प्रभाग २८ मध्ये ३५, प्रभाग २९ मध्ये १६, प्रभाग ३० मध्ये ३३ तर प्रभाग ३१ मध्ये १७ अर्ज विक्री झाली आहेत.

YouTube video player

नाशिकरोड विभागात तीन दिवसात १०७० अर्ज

महापालिका नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी नाशिकरोड विभागातील (Nashik Road Division) ६ प्रभागासाठी विभागीय कार्यालयातून गेल्या तीन दिवसात सुमारे १०७० इतके उमेदवारी अर्ज विक्री झाली आहे, तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार सुधाकर जाधव यांनी आपला अर्ज दाखल केला आहे, दरम्यान आज काही प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. ङ्गनाशिकरोड येथील मनपाच्या विभागीय कार्यालयात दि, २३ पासून महापालिका नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री सुरू आहे, नाशिकरोड भागातील प्रभाग क्र, १७ ते १९ या तीन प्रभागासाठी आतापर्यंत ५२५ तर प्रभाग क्र, २० ते २२ या तीन प्रभागासाठी ५४५ अर्ज विक्री झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नाईक, शर्मिला भोसले यांनी दिली आहे.

प्रभाग ३० मधून एक उमेदवारी अर्ज सादर

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन अर्ज घेण्यासाठी इंदिरानगर भागातून शुक्रवारी (दि.२६) कमी गर्दी दिसून आली. तर एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.युती व आघाड्यांच्या असलेल्या संभ्रमामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये साशंकता असून अर्ज विक्री इतर विभागांच्या मानाने कमी होत आहे. प्रभाग ३० (ड) मधून एका उमेदवाराने आपला अर्ज सादर केला. प्रभाग १६ मधून ५६, २३ मधून ३३, व ३० मधून ३३ इच्छुक उमेदवारांनी अर्ज विकत घेतले. अर्ज भरण्यासाठी २७ तारखेचा मुहूर्त चांगल चांगला असला तरी उमेदवारी अर्जाची निश्चिती व इतर बाबी पूर्ण होत नसल्याने इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अर्पिता फुले यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज पवार, जितेंद्र पाटोळे, प्रशांत सोनवणे, नीळकंठ उगलमुगले आदी लक्ष ठेवून आहेत.

पश्चिम विभागात बारा जागांसाठी पावणेचारशे अर्ज

पश्चिम विभागात गेल्या तीन दिवसांत बारा जागांसाठी पावणेचारशे अर्ज वितरीत झाले आहेत. अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. प्रभाग ७ मधून १३८ तर १२ मधून १२२, प्रभाग २४ मधून ११५ अर्ज गेले आहेत. त्यामुळे ३७५ अर्ज इच्छुकांनी नेऊन यंदा रेकॉर्ड ब्रेक उमेदवार असतील याची जाणीव करून दिली आहे. पश्चिम विभागात निवडणूक अधिकारी आप्पासहेब शिंदे असून त्यांना सहाय्यक अधिकारी म्हणून चंदन घुगे, मुकेश कांबळे, सतीश जाधव काम पाहत आहेत. उद्यापासून कदाचित अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शनिवारी (दि. २७) दुपारी २ ते ५ चांगला मुहूर्त असल्याचे ज्योतिषी सांगत आहेत. तर २८ तारखेला मध्यम दिवस आहे. सोमवारी (दि.२९) सकाळी १० ते ११ आणि दुपारी १२.३० ते ५ हा शुभ मुहूर्त आहे. मात्र प्रत्येकाच्या जन्मकुंडलीनुसार वेगळा मुहूर्तही असतो, सरकट सर्वांना एकच मुहूर्त नसतो, असे पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.

पंचवटीत दोन उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवार (दि. २६) तिसऱ्या दिवशी प्रभाग १ ते ६ साठी मिळून एकूण ९९ इच्छुकांनी १७२ नामनिर्देशन अर्ज खरेदी केले तर प्रभाग क्रमांक २ (क) गटासाठी एक तर प्रभाग क्रमांक ४ (ड) सर्वसाधारण गटासाठी एक असे दोन इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत . प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील ६० उमेदवारांनी १०७ तर प्रभाग क्रमांक ४ ते ६ मधील ३९ उमेदवारांनी ६५ असे एकूण १७२ नामनिर्देशन अर्ज इच्छुक उमेदवारांनी घेतले आहेत. प्रभाग क्रमांक २ मधून १ उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा अहिरे यांनी तर प्रभाग क्रमांक ४ मधून १ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली. निवडणूक प्रकिया सुरू झाल्यानंतर शिवसेना शिंदे गट वगळता अद्याप एकाही महत्वाच्या उमेदवाराने अर्ज दाखल झालेला नाही. तीन दिवसांत सहा प्रभागामधून केवळ ४ अर्ज अद्याप आले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ काहीच दिवस शिल्लक असून सोमवार दि.२९ पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर मंगळवार दि. ३० रोजी पर्यंत दुपारी २ वाजेपर्यंतच मुदत असल्याने या दरम्यान मोठ्या प्रमाणात उमेदवारांची धावपळ होऊन पंचवटी विभागीय कार्यालयाच्या परिसरात प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

आज विक्री सुरू

उद्या शनिवार, दिनांक २७ डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी असली तरी उमेदवारी अर्ज विक्री व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुसक्या आवळून...