Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik NMC Election : चार दिवसांत साडेपाच हजार अर्जांची विक्री; १२८ दाखल,...

Nashik NMC Election : चार दिवसांत साडेपाच हजार अर्जांची विक्री; १२८ दाखल, नाशिकरोडमधून सर्वाधिक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपा निवडणुकीत (NMC Election) उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी २९७ जणांनी ५५३ तर मागील चार दिवसात तब्बल ५४०६ जणांनी अर्ज (Applications) नेले आहेत. आता पर्यंत १२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

- Advertisement -

निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे रविवारची सुटी वगळता अर्ज दाखल करण्यास अवधे दोन दिवस शिल्लक आहेत. निवडणूकीच्या रिंगणात उत्तरण्यासाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले, तरी अद्याप त्यांना कोणालाच राजकीय पक्षांचे अधिकृत ए.बी, फॉर्म
मिळालेले नाहीत.

YouTube video player

दरम्यान, सर्वाधिक इच्छुकांची संख्या असलेल्या भाजपने (BJP) उमेदवारी नाकारलेल्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी मविआला प्रतिक्षा असून बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने मात्र शेवटच्या दोन तासांपूर्वी ए.बी. फॉर्म देण्याची व्यूहरचना आखली असल्याची चर्चा आहे.

पंचवटीत १३ अर्ज

महानगरपालिक। निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २७) प्रभाग १ ते ६ साठी ५३ इच्छुकांनी ११३ नामनिर्देशन अर्ज खरेदी केले तर प्रभाग क्रमांक २ (क) आणि (ड) प्रभाग क्रमांक ३ मध्ये (ब) आणि ( गटासाठी एक तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये (ब) (क) ड) गटासाठी असे एकूण १ ते ६ मधील १३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक ४ ते ६ मधील ४६ उमेदवारांनी २३ असे एकूण ११३ नामनिर्देशन अर्ज इच्छुकांनी घेतले आहेत. प्रभाग क्र.२ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून २ आणि सर्वसाधारण गटातून ३ प्रभाग ३ मधून सर्वसाधारण गटातून १ आणि सर्वसाधारण महिला गटातून १ असे ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिली, तर प्रभाग क्रमांक ४ मधून अनुसूचित जाती जमाती गटातून १ तर प्रभाग क्रमांक ६ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून २ सर्वसाधारण महिला गटातून १ आणि सर्वसाधारण गटातून २ असे ६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिवसेना शिंदे गट (आणि एका माजी नगरसेविकेने अर्ज दाखल केला आहे. चार दिवसांत सहा प्रभागामधून केवळ १६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीनच दिवस शिल्लक असून सोमवार दि.२९ पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे, तर मंगळवार दि.३० रोजी पर्यंत दुपारी २ वाजेपर्यतच मुदत असल्याने या दरम्यान मोठ्या प्रमाणात उमेदवारांची भावपळ होऊन पंचवटी विभागीय कार्यालयाच्या परिसरात प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

पश्चिम विभागात सात अर्ज दाखल

पश्चिम विभागात गेल्या चार दिवसांत बारा जागांसाठी ४१४ अर्ज वितरीत झाले आहेत. तर शनिवारी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा समावेश होता. प्रभाग सातमधून १४१ अर्ज, १२ मधून १३७, प्रभाग २४ मधून १३६ अर्ज गेले आहेत. त्यामुळे एकूण ४१४ अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. अर्ज भरण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने आजपासून अर्ज भरण्यास सुरुव ात. झाली. माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी प्रभाग २४ मधून राष्ट्रबादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातर्फे, त्यानंतर भाजपच्या सोनल दगडे यांनी अर्ज भरला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊलाला तांबडे यांच्या घरातुनही मंगल तांबडे यांनी अर्ज भरला आहे. प्रभाग सातमधून अजिनाथ ना-गरगोजे यांनी उत्वाठा शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म हे (दि.२९) सोमवारी दिले जाणार आहेत. त्यानंतर इच्छुकांचा खरा चेहरा समोर येणार आहे. भाजप शिवसेनेची युती होणार अशा चर्चा असली तरी अद्याप तरी त्याबाबत कोणतेही चिन्ह दिसत नाही.

इंदिरानगर मधून पाच अर्ज दाखल

महापालिके च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रियेच्या अंतर्गत (दि. २७) रोजी इंदिरानगर भागात एकूण ४७ इच्छुक उमेदवारानी नामनिर्देशन अर्ज खरेदी केले तर पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्रभाग १६ मधून २४, प्रभाग २३ मधून ९, तर प्रभाग ३० मधून १४ अर्ज विक्री झाले. प्रभाग १६ च्या ‘ड’ व ‘क’ गटातून वंदना मनचंदा यांनी, प्रभाग २३ ‘क’ मधून गणेश खोडे तर प्रभाग ३० मधून ‘ड’ गटातून अमोल देशमुख व देवानंद बिरारी यांनी अर्ज दाखल केले. अद्यापपर्यंत पक्षाची उमेदवारी जाहीर झाली नसल्याने उमेदवारांनी डमी आज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन वेळेवर दगा फटका नको म्हणून असे उमेदवारी अर्ज दाखल केले जातात उमेदवाराचा पक्षाचा अधिकृत अर्ज अवैध ठरवला गेलास पर्याय व्यबस्था म्हणून उमेदवार असे अर्ज दाखल करतात. उर्वरित दोन दिवसांमध्ये युत्ती व आघाडीकडून तिकीट वाटपाची घोषणा झाल्यास मोठी गर्दी निवडणूक कार्यालयांमध्ये उसळणार असल्याने त्यासंबंधीच्या बैठका निवडणूक अधिकान्यांनी घेऊन सूचना करताना दिसून येत होते.

नाशिकरोडला २३ अर्ज दाखल

महापालिका निवडणुकीसाठी शनिवारी मनपा विभागीय कार्यालयातून ६ प्रभागासाठी एकूण १२४ अर्जाची विक्री झाली तर २३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऋक्षातून देण्यात आली. नाशिकरोड भागातील प्रभाग १७ ते १९ साठी ७२ उमेदवारी अर्ज तर प्रभाग २० ते २२ यासाठी ५२ अर्ज विक्री झाली आहे. दरम्यान आत्तापर्यंत सहाही विभागासाठी सुमारे १९९४ इतके उमेदवारी अर्ज विक्री झाली आहे. शनिवारी प्रभाग १७ ते १९ साठी १५ तर प्रभाग २० ते २२ साठी ८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

सातपूरला ५ दाखल

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८, ९, १० आणि ११ वा चार प्रभागांमध्ये शनिवारी केवळ ३० उमेदवारी अर्जाची विक्री झाली असून, आतापर्यंत ५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सातपूर विभागातील या चारही प्रभागांतून इच्छुक उमेदवारांनी आतापर्यंत एकूण ६४५ उमेदवारी अर्ज नेले आहेत. यामध्ये प्रभाग ८ मधून ११७, प्रभाग ९ मधून ७५, प्रभाग १० मधून २०१, तर प्रभाग ११ मधून सर्वाधिक २५२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख अद्याप चाकी असल्याने त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने विविध राजकीय पक्षांमध्ये तिकीट बाटपाबाबत अजूनही निर्णय झा लेला नाही. यामुळे उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास प्रतीक्षा ठेवली असून, अंतिम दिवसांच्या सुमारास मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...