Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik NMC News : मनपाच्या यादीत ८६ हजार दुबार नावे; हमीपत्र घेऊन...

Nashik NMC News : मनपाच्या यादीत ८६ हजार दुबार नावे; हमीपत्र घेऊन कट करणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

निवडणूक आयोगाच्या ( Election Commission) आदेशानुसार मनपा प्रशासनाने गुरुवारी शहरातील सर्व ३१ प्रभागांची प्रभाग निहाय मतदार यादी (Voter List) जाहीर केली. दरम्यान ही मतदारयादी जाहीर करताना दुबार मतदारांची आकडेवारी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली मतदारसंघाचा काही भागात तब्बल ८६ हजार ६८८ दुबार मतदार समोर आले आहे. दरम्यान मतदानाच्या दिवशी केंद्रप्रमुख ज्यांचे नावे दुबार आहेत. त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन नावे कट करणार आहेत.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) शहरातील बोगस मतदारांवरुन रान उठवले होते. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हयातील दुबार व बोगस मतदारांची यादीच दिली होती. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमधील बोगस मतदारांचा उल्लेख केला होता. आता मनपाच्या यादीत दबार मतदारांची नावे उघड झाल्याने पालिका निवडणुकीत पुन्हा बोगस मतदान होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या मुद्द्यावरून महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

YouTube video player

१ जुलै २०२५ ला नोंद झालेल्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस (NMC) उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरात एकूण १३ लाख ५४ हजार ७७ मतदार आहेत. त्यात सात लाख ४११ पुरुष व सहा लाख ५३ हजार ५८७ महिला व ७९ इतर मतदार आहेत. प्रभागनिहाय मतदार यादी फोडल्यानंतर त्यात तब्बल ८६ हजार ६८८ दुबार मतदार आढळून आले आहेत. एका मतदाराचे नाच यादीत तब्बल दोन वेळा आणि त्यापेक्षा अधिक वेळा आहेत. त्यामुळे शहरातील मतदारांची संख्या फुगली आहे. यादीचे अंतिम छाननी राज्य निवडणूक आयोगाकडूनही केली जाणार आहे. त्यात दुबार मतदारांची आणखी नावे आढळून येण्याची शक्यता आहे. परिणामी, दुबार मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दुबार मतदार आढळून आल्याने शहरात बोगस मतदार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या माध्यमातून निवडणुकीत (Election) बोगस मतदार केले जात असल्याच आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. हरकती व सूचनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुबार मतदारांचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मात्र तोपर्यत दुबार नावांवरून शहरातील राजकारण तापणार आहे.

१२० याद्यांची विक्री

दोन दिवसात प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांकडून आतापर्यंत १२० मतदारयाद्या नेण्यात आल्या आहेत. एका प्रतची किंमत दोन रुपये निश्चित केली आहे. शहरात एकुण ३१ प्रभाग आहे. एका प्रभागातील मतदार संख्या चाळीस हजारांच्यापुढे गेल्याचे चित्र आहे.

दोन तक्रारी

दरम्यान मतदार यादीवर आज दुसऱ्या दिवशी नाशिकरोड भागातून दोन तक्रारी मनपा प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. २७ नोव्हेंबर पर्यंत तक्रार करण्याची मुदत आहे.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...