Wednesday, February 18, 2026
HomeनाशिकNashik NMC Politics : प्रभाग सभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच; ठाकरेंची शिवसेना चमत्कार...

Nashik NMC Politics : प्रभाग सभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच; ठाकरेंची शिवसेना चमत्कार करणार?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सदस्यांची निवडणूक झाल्यानंतर आता प्रभाग समिती सभापती निवडणुकीकडे (Election) सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकरोडमध्ये प्रभाग सभापतिपदासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, ठाकरे गट चमत्कार घडविण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर काही दिवसांत प्रभाग समिती सभापतीची निवडणूक होणार आहे. पहिल्याच वर्षी हे पद मिळावे, यासाठी तिन्ही पक्षांतील इच्छुक नगरसेवकांनी तयारी सुरू केली आहे. नाशिक रोडमध्ये एकूण सहा प्रभाग असून, येथून २३ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे १०, भाजपचे ९ आणि शिवसेना शिंदे गटाचे ४ नगरसेवक असा पक्षीय बलाबल आहे. नऊ वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने नाशिकरोडमध्ये आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. यामागे शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड यांची प्रमुख भूमिका असून, त्यांच्या नेतृत्वाखाली दहा नगरसेवक निवडून आले. भाजपचे (BJP) नऊ नगरसेवक निवडून येण्यात आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

YouTube video player

स्थायी समितीच्या निवडणुकीत नाशिकरोडला चार सदस्यांचे प्रतिनिधित्व मिळाले. ठाकरे गटाचे दोन, भाजपचा एक आणि शिंदे गटाचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने नाशिकरोडला (Nashik Road) योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रभाग सभापतिपदासाठी भाजपकडून विशाल संगमनेरे, डॉ. सीमा ताजणे आणि श्वेता भंडारी स्पर्धेत आहेत. ठाकरे गटाकडून नवोदित तरुण नगरसेवक योगेश भोर, तसेच मंगला आढाव आणि वैशाली दाणी इच्छुक आहेत. शिंदे गटाकडून रमेश धोंगडे आणि सुनीता भोजने यांची नावे चर्चेत आहेत. भाजपशिंदे गट युतीची शक्यता असली तरी ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे प्रभाग सभापतीपदावर कोणाची वर्णी लागणार आणि कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, नाशिकरोडच्या राजकारणात सध्या प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

IND vs NED : टी-२० विश्वचषकात आज भारत-नेदरलँड्स आमनेसामने; कोण मारणार...

0
मुंबई | Mumbai आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेमध्ये बुधवारी (१८ फेब्रुवारी) रोजी अहमदाबाद येथील श्री नरेंद्र मोदी मैदानावर आज भारत...