Sunday, April 13, 2025
HomeनाशिकNashik Onion News : लासलगावला हजाराच्या आत लाल कांदा

Nashik Onion News : लासलगावला हजाराच्या आत लाल कांदा

लासलगाव |वार्ताहर | Lasalgaon

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार (Lasalgaon APMC) समितीत लाल कांद्याची आवक संपुष्टात येत असताना कांद्याचे सरासरी बाजारभाव चार आकडीवरून तीन आकडीवर म्हणजे हजार रुपयांच्या आत ९०० रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Farmer) संतापाची लाट उसळली आहे.

- Advertisement -

दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने या बाजार भावातून उत्पादन खर्च निघणेही कठीण झाल्याने कांदा उत्पादकांत (Onion Growers) संताप व्यक्त केला जात आहे. लासलगाव बाजार समितीत अवघ्या २१ वाहनांतून ३१५ किंटल लाल कांदा विक्रीसाठी आला होता. कांद्याला (Onion) किमान ४०० रु., कमाल १११९रु. तर सरासरी ९०० रुपये प्रतिक्किंटल भाव मिळाला. ११४१ वाहनांतून २०,४७५ किंटल उन्हाळ कांदा विक्रीसाठी आला. कांद्याला किमान ८०० रु., कमाल १३८१ रु. तर सरासरी १२५० रुपये प्रतिक्किंटल भाव मिळाला.

कांद्याला मिळणाऱ्या सरासरी बाजारभावातून उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने दोन हजार रुपयांच्या आत विक्री झालेल्या व विक्री होणाऱ्या कांद्याला प्रतिक्विंटलला एक हजार रुपये अनुदान द्यावे जेणेकरून उत्पादन खर्च भरून निघेल व उर्वरित पैशांमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल, निर्यात मूल्य हटवूनही शेतकऱ्यांना जर न्याय मिळत नसेल तर केंद्र शासनाने नवीन उपाययोजना करावी, असे बाहेगाव साळ येथील कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहार कर म्हणाले.

कांदा बाजारभाव घसरण रोखण्यासाठी कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी संसदेत लावून धरल्यानंतर ही मागणी मान्य होऊन २० टक्के निर्यात शुल्क हठवण्यात आले, तरी कांद्याच्या बाजारभावात घसरण थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे आता नाफेड, एनसीसीएफमार्फत कांद्याची खरेदी थेट बाजार समितीतून व्यापाऱ्यांशी स्पर्चा करत केली तर नक्कीच कांदा बाजारभावातील घसरण थांबवण्यासाठी मदत मिळेन, यासाठी मी नाफेडचे एमडी व अध्यक्ष यांची भेट घेणार आहे.

खासदार भास्कर भगरे

कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्याने ही घसरण थांबवण्यासाठी जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल, यासाठी नियतीला प्रोत्साहनपर सबसिडी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहे.

ज्ञानेश्वर जगताप, सभापती

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरातील काही मुजोर रिक्षाचालकांनी (Rickshaw Driver) आता निर्लज्जपणाचा कळस गाठून सर्वच सीमा पार केल्याचे पुणे रोडवर (Pune Road) शुक्रवारी रात्री...