नाशिक। प्रतिनिधी Nashik
खाकी वर्दीतही भावनिक ओलावा असतो, याचा प्रत्यय रविवारी (दि.१) सकाळी आला. राज्य लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेचा पेपर साेडविणाऱ्या एक गर्भवतीस प्रसवकळा सुरु झाल्या. त्यातच रक्तस्त्राव सुरु झाल्याने सर्व काळजीत पडले. त्याचवेळी परीक्षा केंद्रावर बंदाेबस्तासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे हवालदार जयंत जाधव, महिला अंमलदार रोशनी भामरे कर्तव्यावर होते.
हे देखील वाचा- पोलिसांच्या खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन
नियुक्त महिला व पुरुष अंमलदारांनी माणुसकीसह सतर्कतेचा परिचय देत त्या गर्भवती महिलेस शासकीय व्हॅनमधून रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तत्काळ उपचार केल्याने या महिलेने गाेंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, बाळ व तिची आई सुखरुप असून पाेलीस व डाॅक्टरांचे सर्वस्तरांतून काैतुक हाेत आहे. ही बाब तिच्या पती आणि नातलगांना समजताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. त्यांनी मनोमन पोलिसांचे आभार मानले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
पोलीस मदतीला धावले नसते तर
या कालावधीत गर्भवती महिलेस मदत मिळाली नसती तर तिचे आणि बाळाचे काय झाले असते?, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले. मात्र व्ही. एन. नाईक महाविद्यालयात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि सतर्कता यातून मायलेकी सुरक्षित आहेत.