Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Political : विकासकामांमुळे नितीन पवार यांना पुन्हा संधी

Nashik Political : विकासकामांमुळे नितीन पवार यांना पुन्हा संधी

कळवण | प्रतिनिधी | Kalwan

कळवण व सुरगाणा (Kalwan and Surgana) या दोन तालुका मिळून असलेल्या आदिवासी मतदारसंघात यंदा सलग दुसरी पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नितीन पवार (Nitin Pawar) यांनी विजय पटकावत आपला बालेकिल्ला आणखी मजबुत केला आहे. दुसरीकडे निवडणुकीत कडवे आव्हान उभे करणाऱ्या माकपाचे जे. पी. गावित यांना यंदाही पराभव पत्करावा लागला आहे.

- Advertisement -

आ. नितीन पवार यांनी कळवण सुरगाणा मतदारसंघात जे. पी. गावित (J.P.Gavit) यांच्या विरुद्ध कडवे आव्हान उभे करून रणांगणात उतरून परत एकदा विजयाचा झेंडा रोवला आहे. कळवण सुरगाणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नितीन पवार हे विद्यमान आमदार असून महायुतीत ही जागा सोडली गेली तर महाविकास आघाडीत ही जागा माकपला सोडण्यात आली आणि माजी आमदार जे. पी. गावित हे पुन्हा रणांगणात उतरले मात्र मतदारांनी पुन्हा एकदा नितीन पवार यांना विजयाचा कौल दिला आणि नितीन पवार यांचा विजय झाला.

गेल्या पाच वर्षात कळवण सोबतच नितीन पवार यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे नितीन पवार यांची जमेची बाजू ठरली आहे. सुरगाणा तालुका विकासापासून कोसो दूर असल्याने गेल्या पाच वर्षात नितीन पवार यांनी भरघोस निधी आणत रस्त्यांचे जाळे निर्माण केले. सिंचनाचा प्रश्न सुरगाण्यात गंभीर असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यात श्रीभुवन येथे धरण मंजूर करून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या आशा पल्लवीत केल्या आणि हीच बाजू लक्षात ठेवून जनतेने अजित पवार यांना मताच्या रूपाने साथ दिली.

नितीन पवार यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी सुरगाणा तालुक्यात पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करत तरुण कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. नितीन पवार यांचे दोन्ही तालुक्यात विरोधक मोठ्या प्रमाणात नितीन पवारांचा पराभव करण्यासाठी एकवटले, परंतु नितीन पवार यांनी विरोधकांना पुरून उरत विजयश्री खेचून आणली. महाविकास आघाडीचे उमेदवार कॉम्रेड जे.पी.गावित यांच्या प्रचारार्थ स्वतः शरद पवार यांनी कळवण येथे सभा घेतली तर सुरगाणा (Surgana) येथे खासदार संजय राऊत यांनी जे. पी. गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेतली, परंतु या सभाचा मतदारांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसले नाही नितीन पवारयांनी विकासाचा मुद्दा जनतेत घेत जाऊन विजय मिळविला. जे. पी. गावित यांनी सूत्रबद्ध रीतीने प्रचार करत कळचण सुरगाणा मतदारसंघ पिंजून काढला होता. १०० टक्के आपला विजय निश्चित आहे अशी माजी आमदार जे. पी. गावित यांना खात्री होती, परंतु विकास हा मुद्दा नितीन पवार यांना विजयासाठी काम पडला.

माजी मंत्री स्वर्गीय ए. टी. पवार यांचे काम या परिसरातील जनतेने अनुभवलेले असल्याने त्यांचाच विकास कामांचा वारसा नितीन पवार यांनी गेल्या पाच वर्षात चालवत मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली एकंदरित मृदू आणि मितभाषी स्वभाव काम तडीस नेण्याची जिद्द, विकास केंद्रित राजकारण मतदारसंघात सुख दुःखाच्या निमित्ताने सातत्याने ठेवलेला जन संपर्क या बाजू नितीन पवार यांच्या विजयाला कारणीभूत ठरल्या.माकपचे एकगठ्ठा मतदान, विरोधकांनी एकजूट करत माजी आमदार जे. पी. गावित यांच्या पाठीशी लावलेली ताकद वैयक्तिक टीका टिपण्णी या सगळ्यांना पुरून उरत नितीन पवार यांनी सलग दुसऱ्या वेळेला विधानसभेत बाजी मारली आहे. जे.पी. गावित हे सलग १५ फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. परंतु १६ व्या फेरीपासून नितीन पवार यांनी आघाडी घेत २५ व्या फेरीपर्यंत आघाडी टिकून ठेवत पुन्हा एकदा नितीन पवार यांनी विजय खेचून आणला आहे.

त्याचप्रमाणे आ. नितीन पवार यांचे वडील स्वर्गीय ए. टी. पवार यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अभिप्रेत असलेल्या विकासाची शिकवण दिली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आ. नितीन पवारांनी मतदार संघात सर्वागीण विकास करण्याचा प्रयत्न केला. त्याला मतदार यांनी भक्कम साथ देत मला विजय प्राप्त करून दिला आहे हे कळवण सुरगाणा मतदार संघातील जनतेचे हे उपकार कधीही विसरणार नाही. विजय ही माझ्या कामाची पावती असून विरोधकांनी अपप्रचार करूनही मतदारांनी त्यांना धडा शिकवत मला विजय प्राप्त करून दिला मी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार नितीन पवार यांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...