Thursday, November 7, 2024
HomeनाशिकNashik Political : आनंदवल्ली, गंगापूरमधून सीमा हिरेंना मोठे मताधिक्य मिळणार - कडलग

Nashik Political : आनंदवल्ली, गंगापूरमधून सीमा हिरेंना मोठे मताधिक्य मिळणार – कडलग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या बळावर आनंदवली, गंगापूर, शिवाजीनगर परिसरातून मतदार मोठे मताधिक्य भाजप उमेदवार सीमा हिरे यांना देतील, असा विश्वास ज्येष्ठ नेते भीमराव कडलग यांनी व्यक्त केला. परिसरातून भाजप महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे (Seema Hiray) यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीची सुरुवात भीमराव कडलग (Bhimrao Kadlag) यांच्या हस्ते करण्यात आला.

- Advertisement -

हे देखील वाचा : गुरुदेव कांदे यांच्या प्रचाराचा नांदुर्डीत शुभारंभ

भाजप आमदार (BJP MLA) म्हणून गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांना आणि प्रस्तावित योजनांना गती देण्यासाठी मतदारसंघातून मतदारांनी (Voter) पुन्हा सीमा महेश हिरे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. निशिगंधा मोगल यांनी केले. रॅलीची सुरुवात आरएसएसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ मोगल यांच्या हस्ते करण्यात आली. पुढे ही रॅली मते मंगल कार्यालय, शंकरनगर, श्री गुरुजी रुग्णालय, संत कबीरनगर, कामगारनगर, सदुरुनगर, सोमेश्वर कॉलनी, सिरीन मिडोज, गंगापूर गाव आदी परिसरातून काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिकांनी सीमा हिरे यांचे उत्साहात स्वागत केले.

हे देखील वाचा : ना.झिरवाळ कॅबिनेटमंत्री होतील : तांबडे

यावेळी परिसरातील नागरिकांनी (Citizen) उत्स्फूर्त प्रतिसाद देत, केंद्र व राज्य शासनाच्या जनहिताच्या योजना आणि आमदार सीमा हिरे यांनी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल याविषयी कौतुक केले.ठिकठिकाणी महिलांनी सीमा हिरेंचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. रॅलीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.भाजपा महायुती आणि सीमा हिरे यांच्या जयघोष करणार्या घोषणांनी परिसरात चैतन्य निर्माण झाले. मतदारांच्या भेटीवेळी घरोघरी सीमा हिरे यांना विजयी होणारच, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हे देखील वाचा : Nashik Political : पूर्वसाठी ॲड. ढिकलेंचे नेतृत्व आवश्यक; प्रचार दौऱ्यात संभाजी मोरूसकर यांचे प्रतिपादन

दरम्यान, यावेळी सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड, रोहिणी नायडू, अरुण काळे, रामहरी संभेराव, शिवाजी शहाणे, मिलिंद हिरे, भीमराव कडलग, निलेश जोशी, रवींद्र जोशी, माणिकराव गायकर, नारायण जाधव, अशोक जाधव, शरद काळे, संदीप काळे, गौरव बोडके, महेंद्र शिंदे, दशरथ लोखंडे, अंबादास अहिरे, प्रवीण मौले, महेंद्र पाटील, प्रवीण अहिरे, जयश्री नामपुरकर, गौरव घोलप, प्रवीण पाटील, कैलास जाधव, रूपाली अहिरे, शिवम तिवारी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या