Thursday, May 15, 2025
HomeनाशिकMaharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीला पोषक वातावरण; उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक...

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीला पोषक वातावरण; उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद – गिरीश महाजन

नाराजांचा नाराजगी, गैरसमज दूर करण्यात यश आल्याचा महाजनांचा दावा

नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्रात महायुतीला पोषक वातावरण असून त्यातही उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून राज्यात नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे व्यक्त केला.

- Advertisement -

माघारीच्या आदल्या दिवशी नाशिकमधील तीनही मतदार संघाचा आढावा घेऊन निवडणुकीच्या संदर्भात ते पत्रकारांशी वार्तालाप केला. विद्यमान आमदार आणि उमेदवारांशी, तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून नाराजी गैर समज दूर करण्यात यश आल्याचा दावा महाजन यांनी यावेळी केला.

हे ही वाचा: Nashik Political : वणीत १०० कोटींपेक्षा जास्त कामे झिरवाळांनी केली : कड

लोकसभेला याच पद्धतीने दावा केला असताना अपेक्षित यश मिळाले नाही, विधानसभा निवडणुकीतही तोच दावा कुठल्या आधारावर करीत आहात, या प्रश्नावर उत्तर देतांना महाजन यांनी पुन्हा एकदा फेक नरेटिव्हच्या माथ्यावर खापर फोडले. यावेळी सरकारच्या कामाबद्दल मतदार समाधान व्यक्त करीत असल्याने असे फेक नरेटिव्ह यावेळी चालणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चार तारखेनंतर बंडोबा शांत होतील, चित्र स्पष्ट होईल असा विश्वास शेवटी त्यांनी केला. संजय राऊत, मनोज जरांगे, राज ठाकरे या घटकांवर देखील कटाक्ष टाकला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिकच्या सीपेट प्रकल्पासाठी विनामोबदला जमीन- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) प्रकल्पासाठी जागा विनामोबदला देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...