नाशिक | Nashik
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ विधानसभा मतदारसंघांचे चित्र आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti and Mahavikas Aaghadi) जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांनंतर स्पष्ट झाले आहे. यात गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency) येथील विद्यमान आमदार हिरामण खोसकरांमुळे (Hiraman Khoskar) चांगलाच चर्चेत आला होता. कारण विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खोसकर यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खोसकरांची चलबिचल होत होती.
हे देखील वाचा : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; निफाड, पारनेरचा उमेदवार ठरला
यानंतर खोसकर यांनी मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश (NCP Ajit Pawar) केला होता. त्यांच्यासोबत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काँग्रेसचे (Congress) काही दिग्गज नेतेही राष्ट्रवादीत गेले होते. त्यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले होते.यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हिरामण खोसकरांना उमेदवारी देखील जाहीर झाली होती. त्यामुळे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता? अखेर काल काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, जाधव यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये मोठी नाराजी पसरली असून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : आम्ही राजीनामे देऊ; काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडून एकूण १३ इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली होती. यात इगतपुरीचे माजी सभापती गोपाळ लहांगे, उषा बेंडकोळी हिरामण खोसकर, लकी जाधव यांच्यासह आदींचा समावेश होता. मात्र,काल काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी लकी जाधव यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. कारण लकी जाधव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना कडवी झुंज देऊ शकत नाही, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. तसेच उमेदवार न बदलल्यास राजीनामा देऊ असा इशाराही या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठाना दिला आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; निफाड, पारनेरचा उमेदवार ठरला
यावेळी देशदूतशी बोलतांना काँग्रेसचे एक पदाधिकारी म्हणाले की, आम्ही पक्ष नेतृत्वाला कळविले होते की विद्यमान आमदार खोसकर यांना पराभूत करणारा सक्षम उमेदवार द्यावा. यात माजी आमदार निर्मला गावित, उषा बेंडकोळी आणि गोपाळ लहांगे यांच्यापैकी कुणालाही एकाला उमेदवारी द्यावी. पंरतु, पक्ष नेतृत्वाने आम्हाला योग्य न्याय दिला नाही. त्यामुळे आम्ही दोन्ही तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नाराज असून आमच्या पदांचे राजीनामा देणार आहोत. तसेच आमची नाराजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे फोनद्वारे कळविली आहे, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक पश्चिमची लढत विविधरंगी; प्रबळ दावेदारांमुळे उमेदवारांचा लागणार कस
तसेच काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारे नाराजीचा सुरु नसून पक्षाने लकी जाधव यांच्या रूपाने एका युवा नेतृत्वाला संधी दिली आहे. लकी जाधव हे कायम लोकांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी अग्रेसर असतात. तसेच त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसून ते युवकांचा आवडता चेहरा आहे. त्यामुळे ते एक प्रबळ उमेदवार असून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करू, असे एका पदाधिकाऱ्याने म्हटले.
हे देखील वाचा : Nashik Political : निफाडमध्ये उमेदवार कोण?
तर एका पदाधिकाऱ्याने म्हटले की, काँग्रेस नेतृत्वाने लकी जाधव यांना उमेदवारी (Candidacy) देतांना आमच्यासह कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात घेतले नाही. आमच्या दोन्ही तालुक्यांवर बाहेरचा उमेदवार लादण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड नाराज असून पक्षाने योग्य उमेदवार द्यावा अशी मागणी आम्ही पक्षाकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा