Monday, November 18, 2024
HomeनाशिकNashik Political : सुनिता चारोस्करांच्या विजयासाठी माकप मैदानात

Nashik Political : सुनिता चारोस्करांच्या विजयासाठी माकप मैदानात

चारोस्करांना पाठिंबा तर ५० खोकेवाल्यांना घरी पाठवण्याचे जे. पी. गावितांचे आवाहन

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

५० खोके घेवून पवारसाहेब आणि ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःच्या स्वार्थार्थांसाठी इकडू तिकडे जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. मागील आठवडचात शरदचंद्र पवार साहेबांनी (Sharad Pawar) सभा घेतली आणि गद्दारांना घरी पाठवण्याचे आवाहन केले. तो संदेश घरोघरी पोहचवून विरोधकाचा पराभव करा, त्याचबरोबर महाराष्ट्राला (Maharashtra) नवीन दिशा देण्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता आवश्यकता आहे, त्यासाठी सुनिताताई चारोस्कर यांना निवडून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी माकपच्या वतीने त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत असून सुनिता चारोस्कर यांना निवडून आणू, असा संकल्प माकपचे नेते व माजी आमदार जे. पी. गावित (G.P. Gavit) यांनी केला.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या उमे‌द्वार (Mahavikas Aaghadi Candidate) सुनिता चारोस्कर यांना पाठिंबा देण्यासाठी दिंडोरी येथे माक पच्या वतीने जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी जे. पी. गावित बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माकपचे रमेश चौधरी होते. व्यासपीठावर माकपचे डी. एल. कराड, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, खा. भास्कर भगरे, कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकूळ पिंगळे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. जे. पी. गावित पुढे म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेब तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची स्वतः निर्मित्ती करुन ती तळागाळापर्यंत पोहचवली. परंतू त्या पक्षामध्ये स्वयंनिर्मित केलेले काही भस्मासूरांनी तो पक्ष काबीज करण्याचा जो प्रकार केला तो कोणालाही न पटणारे आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची दशा करुन गुजरात सुजलाम सुफलाम करण्याचे महायुतीचे प्रयत्न आहे. कामगारांचे संरक्षण कायदे देखील मोदी, फडणवीस यांनी बदलवले. ते कायदे परत अंमलात आणून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणे आवश्यक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेद्वाराला आम्ही माकपच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याचे जे. पी. गावित यांनी जाहीर केले.

मागील लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या प्रश्नांवर (Tribal Issues) राजकीय स्वार्थासाठी फक्त देखाये करत राहिले. ‘लाडकी बहिण योजना महाविकास आघाडी सरकार थांबवणार असल्याचा खोटा प्रचार मतांसाठी करत आहे. परंतु लाडकी बहिण योजना थांबवणार नाही तर बहिणींसाठी १५०० च्या दुप्पट ३००० रुपये मविआ देणार असल्याचे सांगितले. त्याचचरोबर कुणी आर्थिक अमिष दाखवत असतील तर त्यास बळी पडून आपले अनमोल मत विकू नका, असे आवाहन देखील माकपचे जे. पी. गावित यांनी केले. यानंतर कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनीही महायुतीच्या ध्येयधोरणांवर टिकास्त्र सोडत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनिता चारोस्कर यांच्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निशाणीला पसंती देत प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केले. प्रास्ताविक आप्पा बटाणे यांनी केले. सुत्रसंचालन तौसिफमनियार यांनी तर आभार शिवसेना नेते जयराम डोखळे यांनी मानले.

विश्वासघातकी सरकार घालवण्यासांठी चारोस्करांना विजय करा – कराड

राज्यामध्ये सत्तेसाठी आमदारांनी (MLA) पवार साहेब व उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. हे महायुतीचे सरकार विश्वासघात व भ्रष्टाचारी मागनि आलेले होते. या अनैतिक पध्दतीने आलेल्या सरकारला सत्तेतून खेचण्यासाठी सर्वांनी एकजुट व्हा. मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिलाच नाही. शेतकरी व आदिवासींच्या न्याय हक्कासाठी नेहमी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते. दिलेला शब्द हे सरकार पाळत नाही. त्यामुळे बदल घडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनिता चारोस्कर यांना विजयी करण्यासाठी तुतारी बाजवणारा माणूस’ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन माकपचे नेते डी.एल. कराड यांनी केले.

आदिवासी शक्ती सेनेचा सुनिता चारोस्करांना पाठिंबा – गांगुर्डे

आदिवासी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्याचबरोबर त्यांना कृतीशिल न्याय देण्यासाठी आमच्या प्रश्नांची जाण असलेल्या व ते प्रश्न सोडवण्याची धमक असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेद्वार सुनिता रामदास चारोस्कर यांना आम्ही आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. समाजकल्याण सभापती म्हणून त्यांनी सर्व तळागाळातील घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्या उच्च शिक्षित असून ते आम्हाला न्याय देतील, असा विश्वास आम्हाला असल्याने आम्ही सर्व आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने त्यांना पाठिंबाच नाही तर त्यांना विजयी करण्याचा संकल्प देखील आम्ही करत असल्याचे प्रतिपादन आदिवासी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे यांनी केले. यावेळी नाना डंबांळे, दिपक मोरे, वसंत बाल्हारे, निलेश मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पेसा निर्णयात युवकांच्या डोळ्यात धुळफेक – खा. भगरे

आदिवासींच्या हक्कासाठी फक्त जे. पी. गावित यांनी साथ दिली. पेसा विषयावर जे. पी. गावितांनी आदिवासींच्या हक्कासाठी लढा दिला. या महायुतीच्या सरकारने न्याय देण्याच्या नावाखाली डोळ्यात धुळफेक केली. पेसा विषयावर सत्ताधारी आमदारांना पुढे करुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी श्रेय लाटू नये, कारण त्यांनी आमच्या युवकांना आवश्यक न्याय दिला नाही. केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवत मागण्या पूर्ण करत असल्याचा बनाव करत आमच्या आदिवासी युवक युवतींच्या डोळ्यात धुळफेक करण्यात आली. त्यामुळे या सरकारला हद्दपार करून महाराष्ट्रात आदिवासींच्या कल्याणासाठी महाविकास आघाडीचे सरकार आवश्यक असून त्यासाठी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निशाणीला पसंती देत सुनिता चारोस्कर यांनी प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन खासदार भास्कर भारे यांनी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या