Sunday, November 17, 2024
HomeनाशिकNashik Political : पेठला रॅली विराट अन सुनिताताईंची 'तुतारी' सुसाट

Nashik Political : पेठला रॅली विराट अन सुनिताताईंची ‘तुतारी’ सुसाट

दिंडोरीसह पेठ तालुक्यातही सुनिताताईंना वाढता पाठिंबा, विरोधक हतबल

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये (Dindori-Peth Assembly Constituency) महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनिता चारोस्कर (Sunita Charoskar) यांचाच बोलबाला सुरु असून महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) तुतारी सुसाट सुटली आहे. दिंडोरी तालुक्याबरोबरच पेठ तालुक्यानेही सुनिता चारोस्कर यांना विजयी करण्याचा संकल्प केला असून काल झालेल्या गावोगावातील सभा आणि पेठ शहरात निघालेल्या हजारो कार्यकत्यांच्या रॅलीने त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे. यंदा भुलथापा आणि जातीयवादी विचाराला थारा न देता महाविकास आघाडीच्या सुनिता चारोस्कर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प दिंडोरीबरोबरच पेठ तालुकावासियांनी केला आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या उमेद्वार सुनिता चारोस्कर यांनी दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) गटागटातील प्रचार संपवून पेठ शहर तसेच कोहोर, धोंडमाळ गटांसह पेठ तालुक्यातील गावोगावात जावून कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, खा. भास्कर भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत प्रचार दौरा सुरु केला आहे. या दरम्यान गावोगावातील महिला व ग्रामस्थांशी चर्चा करत समस्या जाणून घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्ते व पाण्याचा प्रश्न,रोजगारबरोबरच स्थलातरांचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. यामुळे यंदा आम्ही बदल घडवणारच असा पवित्रा पेठवासियांनी घेतला आहे.

इतिहासात (History) पहिल्यांदाच एका महिलेला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळणार असल्याने सुनिता चारोस्कर यांना तळागाळातील महिला, आदिवासी दलित बांधव, शेतकरी, शेतमजूर यांचा मोठा पाठिंबा लाभला असून सुनिता चारोस्कर यांना विधानसभेत आमदार म्हणून पाठवणारच असा विश्वास गावोगावी व्यक्त होताना दिसत आहे. मतदारांशी संपर्क साधताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, रस्ते, बीज, रोजगार, महागाई, शेती या मूलभूत प्रश्नांसंदर्भात सर्व घटकांना न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न करू असे आश्वासन या दरम्यान दिले.

यावेळी एकंदरीतच महाविकास आघाडीच्या उमे‌द्वार सुनीता चारोस्कर यांना वाढता पाठिंबा बघुन विरोधक हतबल झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.दिंडोरीबरोबरच पेठमध्ये देखील सुनिता चारोस्कर यांना वाढत्या पसंतीमुळे पेठ तालुका देखील ‘तुतारी मय झाला आहे. त्यामुळे यंदा दिडोरी पेठ मतदार संघामध्ये’ तुतारी वाजवणारा माणूस’ या निशाणीला मोठा पाठिंबा मिळत असून महाविकास आघाडीच्या उमेद्वार सुनिता चारोस्कर यांचा विजय निश्चित झाल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे.

विकासासाठी ‘साहेबांशी गद्दारी’ करणाऱ्या झिरवाळांचा ‘विकास नेमका गेला कुठे? : जाधव

शरदचंद्र पवार साहेबांशी एक नाही तर दोन वेळा गद्दारी करेल परंतू दिंडोरी पेठ मतदार संघाचा विकास करुन दाखवेल, असा संकल्प जणू झिरवाळांनी केला होता. केवळ विकासाच्या गप्पा जनतेला ऐकाव्या लागल्या. मात्र तो बिकास गेला कुठे? तसेच मागील १५ वर्ष आमदार (MLA) असताना दिंडोरीचा निधी दुसरीकडे खर्च झाला आणि तिकडेच विकास झाला की काय? असा प्रश्न आम्हाला पडतो. ना. झिरवाळांनी केलेला विकास जनतेला दिसत नाही तो विकास हरवला असल्याने त्यांच्या प्रचारात फक्त जातीवादाचे मुद्दे बाहेर येत आहे. विधानसभा उपाध्यक्षपदी विराजमान होवून ही मतदार संघाचा विकास करु न शकलेल्या झिरवाळांनी शेवटी लाडकी बहिण योजनेचा फायदा मिळतो की काय? ते बघितले. परंतू वाढत्या महागाईमुळे त्यातही यश मिळणार नसल्याचे लक्षात येताच आता जातीयवाद या विषयाला हात घातला, हे मतदारांना न पटणारे असल्याने यंदा बदल घडणारच हे निश्चित झाले आहे. यंदा प्रथम महिला आमदार म्हणून सुनिता चारोस्कर यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी त्यांच्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाला पसंती जनतेकडून मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे प्रतिपादन युवा नेते सुदर्शन जाधव यांनी केले आहे.

भुलथापांना आणि जातीयवादाला बळी न पडता आता बदल घडवणार : थालकर

साहेब विधानसभेचे उपाध्यक्ष झाले, परंतू आमच्या समस्या तशाच राहिल्या. त्यांच्याकडून ज्या विकासाच्या अपेक्षा आम्ही ठेवल्या होत्या, त्या पूर्ण करण्यात झिरवाळांना अपयश आले आहे. आता त्यांच्या भुलथापांना आम्ही बळी पडणार नाही. तालुक्याला जोडणारे रस्ते अतिशय खराब झाले आहे. वारंवार लक्षात आणून देवून देखील रस्ते सुधारले नाही. गावोगावी पाण्याची समस्या बिकट झाली आहे. तहान भागविण्यासाठी डोंगरदऱ्याातून वाट काढत महिलांना मोठी कसरत करावी लागते. पावसाचे प्रमाण प्रचंड असूनही त्याचा साठा होत नाही. ते पाणी आमच्या पिण्यासाठी वापरात येत नाही. तसेचबारमाही शेती करता येत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी कुटूंबापासून दूर होत स्थलांतर करावे लागते. ही अतिशय खेदाची बाब आहे. आरोग्य, शिक्षणाची समस्या कायमच आहे. त्यामुळे आता भुलथापा व जातीय मुद्याला बळीन पडता मतदार संघात बदल घडवण्याचा संकल्प आम्ही पेठवासियांनी केला आहे. झिरवाळांकडून ज्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुनिताताई चारोस्कर यांच्या ‘तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला पसंती देवून आम्ही भरघोस मतांनी निवडून देणार असल्याचे प्रतिपादन यशवंत थालकर यांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या