Sunday, October 27, 2024
HomeनाशिकNashik Political : माजी मंत्री बबनराव घोलप यांची घरवापसी; शिवसेना उद्धव बाळासाहेब...

Nashik Political : माजी मंत्री बबनराव घोलप यांची घरवापसी; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

चर्मकार समाजाच्या व देवळाली मतदारसंघात (Deolali Constituency) सुचवलेली आवश्यक कामे न झाल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) राजीनामा दिल्यानंतर आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा प्रवेश करून घरवापसी केली.

- Advertisement -

गेल्या आठ महिन्यापूर्वी देवळालीचे पाच वेळा आमदार (MLA) असलेले व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.घोलप जरी शिवसेनेत (एकनाथ शिंदे) गेले तरी त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप मात्र शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षातच होते. यंदा देवळालीची जागा मिळवण्यासाठी त्यांनी मोठी पराकष्ठा केली होती.

देवळाली मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (NCP Sharad Pawar) सुटावी या आशेने योगेश घोलप (Yogesh Gholap) यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची तयारी होती. मोठ्या उलाढालनंतर काल देवळालीची जागा शिवसेना (उबाठा) पक्षाला सुटली आणि उमेदवारीची माळ योगेश घोलप यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर आज माजी मंत्री बबनराव घोलप यांनी चर्मकार समाजाचे कामे व देवळाली मतदारसंघात आवश्यक सांगितलेली कामे न केल्याने शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले.

तसेच आगामी देवळालीच्या जागेवर पुत्र योगेश घोलप यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देऊन माझ्यावर मोठे उपकार केल्याचे बबनराव घोलप यांनी सांगितले व त्या करणावरून राजीनामा (Resignation) देत असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, आज मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बबनराव घोलप यांनी प्रवेश केला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जगन आगळे प्रकाश म्हस्के, अस्लम मणियार, कुलदीप आढाव आदी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या