Sunday, November 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : कळवण व सुरगाणा तालुक्यात जनतेला सुरळीत वीजपुरवठ्याचे आपले पुढील...

Nashik Political : कळवण व सुरगाणा तालुक्यात जनतेला सुरळीत वीजपुरवठ्याचे आपले पुढील नियोजन : आ. नितीन पवार

अभोणा येथे प्रचार रॅलीत व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा

अभोणा । प्रतिनिधी Abhona

शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचे थकित वीजबिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून शेतकर्‍यांना मोफत वीज मिळणार आहे. शेतकर्‍यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. कळवण व सुरगाणा तालुक्यातील जीर्ण वीज वाहिन्या, पोल बदलून शेतकरी बांधव व जनतेला सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आपले नियोजन असून वीज प्रश्नासंदर्भात अधिक काम करायचे आहे, त्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीन पवार यांनी अभोणा येथील प्रचार सभेत केले.

- Advertisement -

अभोणा शहरातील आठवडे बाजार प्रचारफेरी काढून आमदार नितीन पवार यांनी व्यापारी बांधव व नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. लाडक्या बहिणींनी ठिकठिकाणी आमदार पवार यांचे औक्षण केले तर व्यापारी मतदार बांधवांनी सत्कार करत आपला पाठिंबा दर्शवला. अभोणा चौफुलीवर आयोजित प्रचार सभेत बोलताना आमदार नितीन पवार यांनी सांगितले की, कळवण आणि सुरगाणा तालुक्यात विकासकामांची घोडदौड अशीच पुढे सुरू ठेवायची आहे. जनता विकासाबरोबर आहे. नेतेमंडळी विरोधात असली तरी मतदार राजा हा विकासाबरोबर आहे. त्यामुळे विरोधकांनी अपप्रचार सुरू केला आहे. त्याला भीक घालू नका, असे आवाहन आमदार पवार यांनी केले.

गोपाळखडी, ढेकांळे, बालापूर, हिंगळवाडी येथील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी चणकापूरमधून पाणी कसे देता येईल याचे नियोजन करायचे असून देवळीकराड, निरगुडपाडा या भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. कळवण तालुक्यातील जनतेला विकास बघायची सवय आहे. ही विकासाची घोडदौड थांबवू नका. तालुक्यातील नदी-नाल्यांवर बंधारे बांधल्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली. पुढील काळातदेखील ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे नियोजन असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी नेते देवीदास पवार, ज्येष्ठ नेते शिरीष शहा, डी. एम. गायकवाड, विठ्ठल महाले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, नगरसेवक मोतीराम पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, ज्येष्ठ नेते राजूबाबा वेढणे, भाजप नेते सुधाकर पगार, विकास देशमुख, निंबा पगार, हेमंत रावले, हरिभाऊ वाघ, मधुकर वाघ, मधुकर जाधव युवराज गांगुर्डे, देवा मुसळे, विजय जाधव, बाळासाहेब सूर्यवंशी, कृष्णकुमार कामळस्कर, भगवान पाटील, अनिल घोडेस्वार, मनोज वेढणे, चेतन बिरार, युवराज गांगुर्डे, बापू जगताप, सोमनाथ सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या