नाशिक | Nashik
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील (Nashik West Assembly Constituency) महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) उमेदवार सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या प्रचाराने आता कमालीचा वेग घेतला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस तसेच कम्युनिस्ट आणि मित्र पक्षांनी बडगुजर यांच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन बडगुजर यांना निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत. गाड्यांचा ताफा आणि जोरदार घोषणाबाजीने मंगळवारी जुने सिङको व भुजबळ फार्म परिसर दणाणून गेला.
हे देखील वाचा : Nashik Political : देवळाली मतदारसंघात आ. सरोज आहिरेंचा झंझावात
बडगुजर आणि महाचिकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) पदाधिकारी व कार्यकत्यांनी मंगळवारी सत्यम स्वीट, कालिका पार्क, जुने सागर स्वीट (रिच स्वीट), ध्यानमंदिर, आर.डी. सर्कल, रणभूमी, प्रियंका पार्क, जगतापमळा, खोडेमळा, इच्छामणी कॉलनी, मुक्तानंद शाळा, हनुमान चौक, सिद्धेश्वर मंदिर चौक, झिनत कॉलनी, महात्मा फुले उद्यान, महाराणाप्रताप चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, तुळजाभवानी मंदिर, बडदेनगर, शिवाजी चौकभाजी मार्केट, सप्तशृंगी चौक, शांतीनगर, भुजबळ फार्म (सुंदरबन कॉलनी) आदी भागात प्रचाररॅली काढली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि प्रा. नितीन बानुगडे आदींच्या सभांना झालेली प्रचंड गर्दी यामुळे कार्यकत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : वसंत गिते विक्रमी मतांनी जिंकणार; शिवसेना उपनेते सुनील बागुल यांना विश्वास
आमदारांनी (MLA) जी कामे केली नाहीत त्यापेक्षा अधिक कामे बडगुजर यांनी त्यांच्या नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत केल्याचे आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि चानुगडे पाटील यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केल्यामुळे त्याचीच चर्चा रंगू लागली आहे. विद्यमान आमदार आणि बडगुजर यांच्या कामांच्या तुलनेचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माजी आमदार अपूर्व हिरे, कामगार नेते डॉ.डी. एल. कराड, तानाजी जायभावे, अण्णा पाटील, डॉ. सुभाष देवरे, लक्ष्मण जायभावे, नानासाहेब महाले यांनी बडगुजर यांना आमदार करण्याचा विडाच उचलला आहे. प्रत्येक सभेला तसेच प्रचार दौन्यात हजर राहून ते बडगुजर यांना निवडून आणण्याचे आवाहन मतदारांना करीत आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या (Shivsena) विचारधारेचे मी तंतोतंत पालन केले आहे.
हे देखील वाचा : माझ्यावर आणि विकासकामांवर जनतेचे प्रेम : आ.सीमा हिरे
नगरसेवकपदाच्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत मी नाशिक पश्चिमसह महानगराच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. पक्षाने मला जी पदे दिली त्याला पुरेपूर न्याय देत मी अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनतेचा दुवा घेतला आहे. सातपूर आणि लिङको पौरसर हा माझा श्वास असून या परिसराचा पूर्ण कायापालट करण्यासाठी, विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथे आणण्यास तसेच बेरोजगारी दूर करण्यास पक्षाने मला नाशिक पश्चिम मतदार संघातून आमदारकीची उमेदवारी दिली आहे. निवडून आल्यानंतर मी जनसामान्यांची सेवा करेन, त्यांच्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडेन आणि मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी (Funds) खेचून आणून आदर्श मतदारसंघ निर्माण करेल असे अभिवचन बडगुजर यांनी मतदारांशी संवाद साधताना दिले.
हे देखील वाचा : Nashik Political : ॲड. राहुल ढिकले पुन्हा विधानसभेत जाणार – आढाव
दरम्यान, यावेळी ‘बडगुजर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’, येऊन येऊन येणार कोण बडगुजर यांच्याशिवाय आहेच कोण आदी घोषणांनी परिसर दणाणून जात आहे. प्रचार दौन्यात नानासाहेब महाले, लक्ष्मण जायभावे, चंद्रकांत पांडे, सीमाताई बडदे, बाळासाहेब गिते, नाना सोमवंशी, बाबासाहेब गायकवाड, विष्णु पवार, वंदना पाटील, निलेश साळुंखे, कैलास चुंबळे, सागर मोटकरी, सुशील बडदे, शिवानी पांडे, रमेश उघडे. संदीप पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा