नाशिक | Nashik
घरकुल, वनजमिनीसाठी गोरगरीब जनतेकडून पैसे गोळा करणारे आता कळवण तालुक्यात विकासाची भाषा करत आहे, ४० वर्षे काय केले हे आधी जनतेला सांगा मग व्हिजन सांगा, सुरगाणा तालुक्यात दहशतीचे राजकारण सुरु असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी भक्कम उभा आहे. दहशतवादाला जशास तसें उत्तर देण्याचा इशारा आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांनी दिला.
हे देखील वाचा : Nashik Political : निफाड मतदारसंघातून गुरुदेव कांदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून (Kalwan Surgana Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीने आमदार नितीन पवार यांनी नामनिर्देशन दाखल केले. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी कळवण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीन पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कळवण बाजार समितीपासून मानूरपर्यंत रॅली काढून शहरातील मतदारांना अभिवादन करत मानूरला समारोप केला. आमदार पवार यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले, व्यापारी बांधवानी सत्कार केला.
हे देखील वाचा : Nashik Political : महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज
आमदार नितीन पवार पुढे म्हणाले की, स्व. ए. टी. पवारांनी विकासाची शिकवण दिली असल्यामुळे कळवण सुरगाणा तालुक्यातील प्रत्येक गाव आणि माणसाचा विकास करण्याचा आपला संकल्प आहे तुम्ही दिलेल्या पहिल्याच संधीत मी २२००-२३०० कोटींचा निधी आणला. जनतेनी मागणी केलेली विकासकामे केली ह्या विकासकामांवर टीका करणारे जनतेच्या मागण्यांची खिल्ली उडवतात. जनतेने संधी दिली, काम करण्याची जबाबदारी माझी असल्यामुळे मी निधी आणण्यात यशस्वी झाल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
हे देखील वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाच उमेदवारांची यादी जाहीर; पंढरपूरात होणार मैत्रीपूर्ण लढत?
आमदार पवार पुढे म्हणाले की चाळीस वर्षात सुरगाण्याच्या विकास करू शकले नाही ते आता विकास करू म्हणत आहेत. ओतूर, जामशेत धरणाचा पाठपुरावा मी केला. व्हिडिओ दाखवणे आणि पाठपुरावा करणे यातला फरक जनतेला कळतो. अलंगुनचा बंधारा दुरुस्त करू शकले नाही ते आता आम्ही धरण केल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे. श्रेय घेण्यापेक्षा समोर येऊन बाजू मांडा असे आवाहन आमदार पवार यांनी विरोधकांना केले.
हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : भाजपची चौथी उमेदवार यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?
आमदार पवार पुढे म्हणाले की मी ए. टी. पवारांचा मुलगा त्यांना अभिप्रेत कामच करणार. तुमच्यासारखे घरकुलासाठी गोरगरिबांकडून तीनशे रुपये गोळा करत नाही. मोर्चे काढून फक्त संस्था वाढवल्या. कारखाना खाणाऱ्यांनी चार तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं वाटोळं केलं ते आता माझ्यावर टीका करतात. पश्चिम पट्ट्यात जाऊन लोकांना भूलथापा देतात. जनता आमच्यासोबत आहे आम्हाला तुमच्यासारखे बाहेर तालुक्यातले लोक आणावे लागत नसल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
हे देखील वाचा : CM एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत ५ वर्षात तिपटीने वाढ, एकूण संपत्ती किती?
दरम्यान, यावेळी अशोक पवार, मोहन जाधव, नवसू गायकवाड, हेमंत पाटील, तुळशीराम महाले, यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले. आभार राजेंद्र भामरे यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, मविप्र चे माजी संचालक अशोक पवार, यशवंत गवळी, गोपाळ धूम यांच्यासह आदी उपस्थित होते.
महिला भगिनींसोबत भरला फॉर्म
नितिन पवार यांनी गुलाबी साडी परिधान केलेल्या आदिवासी भगिनीसमवेत तहसील कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीत हजारो महिला भगिनींची उपस्थिती होती आदिवासी महिलांनी सभेत स्वतः जागेवर उठून नितिन पवारांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
रॅलीने वेधले लक्ष
रॅलीच्या प्रारंभी वारकरी पथक आणि आदिवासी कलापथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीत महिला भगिनिंचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नितिन पवार यांनी
पुष्पहार अर्पण केला.
विरोधकांवर टीकास्त्र
ज्यांना विकासाची भाषा बोलता येत नाही ते दहशत, दमदाटी करतात. विकासाला उत्तर नसल्याने भूलथापा देऊन जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग काही जणांनी चालवला असून जनता विकासालाच साथ देईल. ज्यांनी ४० वर्ष आमदारकी भोगून सुरगाण्याला विकासापासून वंचित ठेवले ते आता कळवणकरांना विकासाचे व्हिजन सांगत असल्याची खरमरीत टीका नितिन पवार यांनी विरोधकांवर केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा