नाशिक | Nashik
पाच वर्षे सातत्याने मतदारांशी संपर्क ठेवल्याने आमदार ॲड.राहुल ढिकले (Rahul Dhikale) घराघरात पोहोचले. करोनाकाळात ॲड. ढिकले यांनी केलेले काम अनेकांच्या मदतीला आले. पुढील पाच वर्षात सिंहस्थ निधीतून पूर्व मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी ॲड. ढिकले यांचेच नेतृत्व आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी केले.
विधानसभेच्या नाशिक पूर्व मतदारसंघातील (Nashik East Constituency) महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांनी आज पंचवटीतील प्रभाग क्रमांक पाचमधील पेठफाटा, नवरंग मंगल कार्यालय, चित्रकूट सोसायटी येथील मतदारांची सकाळच्या सत्रात भेट घेतली. सायंकाळी नाशिकरोड भागातील (Nashik Road Area) डावखरवाडी, सूर्योदय सोसायटी येथे नागरिकांच्या बैठका घेऊन पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन मांडले. सन २०१९ मध्ये ॲड. राहुल ढिकले हे भाजपकडून उभे राहिले पहिल्याच निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. आता देखील विकास कामांच्या जोरावर ढिकले हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हे देखील वाचा : गुरुदेव कांदे यांच्या प्रचाराचा नांदुर्डीत शुभारंभ
मागील पाच वर्षात ॲड. ढिकले यांनी आमदारकीच्या कारकिर्दीत ‘न भूतो’ असा विकास करून दाखवला. छत्रपती संभाजी महामार्गावरील ( Chhatrapati Sambhaji Highway) दोन उड्डाणपूल व वैद्यकीय महाविद्यालय या मोठ्या कामांबरोबरच कॉलनी अंतर्गत रस्ते, मंदिरांची डागडूजी, नवीन मंदिरांची उभारणी, तपोवनात उभारण्यात आलेले ७१ फुटी प्रभू श्रीरामाचे शिल्प, पेठ रोडचे काँक्रिटीकरण, मळे भागात रस्ते तसेच पथदिप व्यवस्था, पंचक येथे अमृत गार्डनची निर्मिती या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : ना.झिरवाळ कॅबिनेटमंत्री होतील : तांबडे
दरम्यान, या प्रचार दौऱ्यात अंबादास पगारे, माधुरी पालवे, रामभाऊ कदम, संतोष क्षीरसागर, दामूभाई साखला, मोहनभाई पटेल, ईश्वरभाई पटेल, खिमजीभाई पटेल, चंदुभाई छबैय, गोपालभाई पटेल, प्रकाशभाई पटेल, अनिलभाई पटेल, रमेशभाई पटेल, बिपीनभाई पटेल, मुकेशभाई पटेल, भारतभाई पटेल, देवेंद्रभाई पटेल, हेतलभाई पटेल, पंकज गुजराणी, गौरव सुराणा, रूपेश मोदी, मूलचंद बेदमुथा, सुनिल बंब, हर्षल कुमट, पांडुरंग येवले, मिलिंद कुलकर्णी, संतोष जाधव, भूषण रावत, सागर चौगुले, सागर कोठुळे, पंकज वाणी, स्वप्निल ओढाणे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते, मतदारबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा