नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील (Nashik West Assembly Constituency) सुजाण जनता माझ्या व्यक्तिमत्त्वाची, माझ्या दहा वर्षांच्या कारकिर्दीची, माझ्या प्रामाणिक आणि निरपेक्ष जनसेवेची तुलना माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांशी (candidates) करत असून, त्यातून येणाऱ्या निष्कर्षांमुळे जनता या निवडणुकीत पुन्हा माझ्याच पाठीशी आहे, असा विश्वास नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार सीमा महेश हिरे यांनी व्यक्त केला.
नवीन नाशकातील (New Nashik) प्रभाग क्रमांक २४ मध्ये रविवारी सकाळी हिरेंच्या प्रचारासाठी काढलेल्या भव्य बाईक रॅली वेळी हिरेंनी विश्वास व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून सीमा हिरेंनी मतदार संघात प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. हिरेंनी प्रचार फेऱ्या, बाईक रॅलींचा नवीन नाशिक, सातपूर, इंदिरानगर भागात धडाका लावला आहे. सर्वत्र त्यांना जनतेचा प्रचंड असा सकारात्मक पाठिंबा, शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत. रविवारी सकाळच्या सत्रात प्रभाग क्रमांक २४ मधील विविध भागातून भव्य बाईक रॅली काढली. ही रॅली कालिका पार्क येथून सुरू होऊन प्रियंका पार्क, म्हसोबा महाराज मंदिर, पांगरे मळा, बडदे नगर , कमोदनगर, प्रकाश पेट्रोल पंप, गोविंद नगर परिसर, शांतीनगर, लेखा नगर, मॉडर्न शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले गार्डन, औदुंबर चौक, हनुमान मंदिर मार्गे महाराणा प्रताप चौक येथे रॅलीचा समारोप झाला.
या रॅलीत उमेदवार सीमा हिरे (Seema Hiray) यांच्या समवेत शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, राजेंद्र महाले, अश्विनी बोरस्ते, रवी पाटील, राजेंद्र मोहिते, इसाक शेख, विजय लहामगे, सुमित कोष्टी, शिरीष शिरवाडकर, अविनाश ढवळे, अनिकेत वाघ, जुनैद खतीब, विक्रम भामरे, सुनील पवार, धवल डरंगे, सुलोचना मोहिते, मंगला पाटील, मीनाक्षी खैरनार, रत्ना वाघ, राहुल गणोरे, राजेंद्र जडे, शैलेश साळुंखे, प्रवीण मोरे, डी बी राजपूत, अजिंक्य गीते, निखिल पाटील, उमेश पाटील, अभय गवळे, तेजस गीते, राजेंद्र हिरे, अक्षय वाणी आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दिलीप दातीर यांचा सीमा हिरेंना जाहीर पाठिंबा
मनसेनेला नुकतीच सोडचिठ्ठी दिलेले माजी जिल्हाप्रमुख दिलीप दातीर यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुतीतील भाजपच्या उमेदवार सिमा हिरे यांना जाहीर पाठींबा दिला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दातीर यांनी मनसेनेकडून उमेदवारी लढवीत तब्बल २५ हजार ५०० मते मिळविली होती. त्यांच्या याच मतांचा सीमा हिरे यांना फायदा होईल, असा विश्वास दातीर यांनी यावेळी व्यक्त केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा