Friday, November 1, 2024
HomeनाशिकNashik Political : वणीत १०० कोटींपेक्षा जास्त कामे झिरवाळांनी केली : कड

Nashik Political : वणीत १०० कोटींपेक्षा जास्त कामे झिरवाळांनी केली : कड

इच्छुक उमेदवार भरसट यांचा ना. झिरवाळ यांना पाठिंबा जाहीर

दिंडोरी | प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील वणी जिल्हा परिषद गटात १०० कोटींपेक्षा जास्त विकासनिधी आणुन नामदार नरहरी झिरवाळ यांनी इतिहास रचला आहे. वणी शहराला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्याला ना. झिरवाळ यांनी निधी दिला आहे. विकासाचा हा रथ पुढे न्यायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र होऊन या विकासपुरुषाच्या मागे खंबीर उभे राहुन पुन्हा एकदा घड्याळाला मताधिक्य मिळवुन द्यावे लागणार आहे, असे प्रतिपादन वणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास कड यांनी केले. यावेळी इच्छुक उमेदवार तथा वणीचे सरपंच मधुकर भरसठ यांनी ना. झिरवाळ यांना पाठिंबा जाहीर केला व त्यांच्या व्यासपीठावरही विराजमान झाले.

वणी येथे ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक झाली त्याप्रसंगी विलास कड बोलत होते. अध्यक्षस्थानी वणीचे सरपंच मधुकर भरसठ होते. विलास कड पुढे म्हणाले नरहरी झिरवाळ आणि वणी शहर हे घट्ट नाते बनले आहे. आतापर्यंत ना. झिरवाळ यांनी अनेकांना वेगवेगळी मदत केली आहे. वणी परिसरात एकही गाव नाही की जेथे झिरवाळ यांनी निधी दिला नाही. वैद्यकीय सेवेबाबत तर नरहरी झिरवाळ यांनी प्रचंड सहकार्य गोरगरिबांना केलेले आहे. त्यामुळे हेच आशीर्वाद जनता नरहरी झिरवाळ यांना मतदान करुन देतील असेही कड म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा : Nashik Political : आमदार ढिकले यांनी पाच वर्षात केलेल्या कामांची पावती मतदारांकडून मिळणार – संतोष भोर

नरहरी झिरवाळ हे आगामी काळात मंत्री होतील, त्यामुळे आपल्याला विकासासासाठी झिरवाळ यांनाच मतदान करावे असे कड म्हणाले. नरहरी झिरवाळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणुन विकासाची दिवाळी साजरी करु असे प्रतिपादन जेष्ठ नेते मनोज शर्मा यांनी केले. यावेळी वणी परिसरातील मोठ्या संख्येने अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी ‘नरहरी झिरवाळ आगे बढो हम तुम्हारे साथ है’ आदी घोषणा दिल्या. अंध अपंग संघटनेचे अध्यक्ष मच्छिद्र मोरे यांनीही झिरवाळ यांना पाठिबा जाहिर केला. सर्व गोरगरीब अपंग बांधवांचे आशिर्वाद झिरवाळ यांच्याबरोबर रहातील असे मोरे यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय सेवक संघाचे सुरेश वर्मा, वसंत कावळे, जे. डी. केदार, सदुभाऊ शेळके, अशोकमामा भालेराव, वसंतराव भोये, विश्वासराव देशमुख, जगन वाघ आदींनी झिरवाळ यांच्या कामाची प्रशंसा केली व सर्वांनी घड्याळाला मतदान करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सभेत पुर्ण घड्याळमय वातावरण झाले होते.

यावेळी गणेश देशमुख, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, केशवराव भोये, नितीन मेधणे, रघुनाथ पाटील, नानासाहेब सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी एकनाथ गायकवाड, बाळासाहेब जाधव, प्रकाश वडजे, विष्णू पाटील, बबनराव जाधव, राहुल गांगुर्डे, जगन वाघ, नामदेव गवळी, उत्तम राऊत, संतोष पाडवी, कैलास धुम, बंटी बागूल, धनाजी गायकवाड, कृष्णा मातेरे, मनोज शर्मा, महेंद्र बोरा, महेंद्र पारख, रोशन समदडीया, रामभाऊ ढगे, गोटीराम वाळके, रमेश भालेराव, विजय पाटील, राजेंद्र थोरात, दुर्गेश चितोडे, संजय गोतरणे, रामदास घडवजे, सुरेश कोंड, रंगनाथ बर्डे, जहीर शेख, बाळासाहेब समदडीया, लक्ष्मण कटे, अतूल निगळ, नितीन भालेराव, विशाल कड, भास्करराव फुगट, पंडीत बागूल, सम्राट राऊत, दत्तू राऊत आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या