Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषदेसाठी ९९.८४ टक्के मतदान; उमेदवारांचे...

Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषदेसाठी ९९.८४ टक्के मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपत्रिकेत बंद, निकालाकडे लक्ष

नाशिक | Nashik

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Vidhan Parishad Election) आज (गुरुवार) सकाळी ८ वाजेपासून मतदानास (Voting) प्रारंभ झाला होता. जिल्ह्यात नऊ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली होती. या सर्व मतदान केंद्रांवर सकाळच्या सुमारास मतदारांचा थंड प्रतिसाद बघायला मिळाला. मात्र, दुपारनंतर मतदार केंद्रांवर जाऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत नाशिक विधान परिषदेसाठी ९९.८४ टक्के इतके मतदान झाले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : सकाळपासून मतदानाला सुरुवात; कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात, महायुतीतर्फे दराडे रिंगणात

नाशिक विधानपरिषदेच्या एकूण ६१९ मतदारांपैकी (Voter) ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर जाऊन मतदान केले. यात ३१९ महिला नगरसेविका आणि २९९ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे. तर मालेगाव महापालिकेतील (Malegaon Mahapalika) एका नगरसेवकाने (Corporator) मतदानाचा हक्क न बजावल्याने एकूण ६१८ मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले असून, एका मतदान केंद्रावर ९८.८१ टक्के मतदान झाले आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीने (ठाकरे गट) अधिकृत उमेदवार उभा न केल्यामुळे ही लढत प्रामुख्याने महायुती (Mahayuti) अंतर्गत आणि बंडखोरांभोवती फिरत राहिली आहे. निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे (शिवसेना शिंदे गट) हे होते. पंरतु, भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी गिते यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मतदानाच्या आठ दिवस आधी आपला प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे (Prasad Hire) यांनी दराडे यांना पाठिंबा जाहीर केला होता.

हे देखील वाचा : Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी दुपारपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान; येवल्यात १२ पर्यंत एकाने बजावला हक्क

दरम्यान, गिते आणि हिरे यांनी कायदेशीर मुदतीनंतर थांबण्याचा निर्णय घेतल्याने मतपत्रिकेवर दोघांचीही नावे कायम होती. यामुळे पसंतीक्रमाची मते फुटण्याची धास्ती महायुतीला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता सोमवार (दि.२२) रोजी लागणार्‍या निकालावेळीच कोणाची किती मते फुटली हे स्पष्ट होईल. दुसरीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळाले. राजकीय वैर विसरून मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला.तर संख्याबळ अनुकूल असूनही संभाव्य दगाफटका आणि अंतर्गत नाराजी टाळण्यासाठी महायुतीने आपल्या मतदारांना सुरक्षित स्थळी (सहलीवर) रवाना करण्याची खबरदारी घेतली होती.

कुठे किती मतदार होते?

नाशिक महापालिका १२२, भगूर नगरपरिषद २३, देवळाली छावणी परिषद १, दिंडोरी नगरपंचायत १९, पेठ नगरपंचायत १८. इगतपुरी नगरपरिषद २४, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद २३, निफाड नगरपंचायत १९, पिंपळगाव बसवंत नगरपरिषद २९, ओझर नगरपरिषद २८, सिन्नर नगरपरिषद ३४, येवला नगरपरिषद ३०, नांदगाव नगरपरिषद २३, मनमाड नगरपरिषद ३५, मालेगाव महापालिका ८४, चांदवड नगरपरिषद २३, देवळा नगरपंचायत १८, कळवण नगरपंचायत १९, सुरगाणा नगरपंचायत १९, सटाणा नगरपरिषद २८

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नाशिकरोड जेलमध्ये पाटणकर, लोंढेची दादागिरी; जामिनावर बाहेर...

0
नाशिक | Nashik अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) दाखल असलेल्या 'मकोका' गुन्ह्यातील एका संशयिताने (Suspected) जेलच्या बरैकमध्येच दुसऱ्या सहसंशयितास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार...