नाशिक | प्रतिनिधी
खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका आणि माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनी आज शुक्रवार (१४ नोव्हे) माजी नगरसेवकांनी आज जाहीर प्रवेश केला. जलसंपदा आणि नाशिक कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी त्यांचे स्वागत करुन आता सिन्नर नगरपालिकेवरही भाजपचा झेंडा फडकल्या शिवाय राहणार नाही, असा दृढ विश्वास व्यक्त केला.
हेमंत वाजे हे शिवसेनेकडून ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. तशी चाचपणी त्यांनी काही दिवसांपासून सुरूही केली होती. दरम्यान, वाजे यांना भाजपकडून गळाला लावण्याचे प्रयत्न नुकतेच प्रवेश केलेल्या युवा नेते उदय सांगळे, भारत कोकाटे यांच्याकडून सुरु होते. मात्र, सर्वच उमेदवार पक्षाच्या सर्वेनंतर ठरणार असल्याचे सांगितले जात असल्याने वाजे यांचा प्रवेश लांबला होता. अखेर शुक्रवारी वाजे यांनी कमळ हाती घेत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
यावेळी महाजन म्हणाले की, वाजेंचा पायगुण चांगला आहे. बिहारमध्ये घवघवीत यश पक्षाला मिळाले आहे. आता सिन्नरची चिंता दुर झाली आहे. सिन्नर मध्येही शंभर टक्के विजयी होऊ असा विश्वास आला आहे. वाजे यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी वाढली आहे.
वाजे म्हणाले की, सिन्नरमध्ये अनेक समस्या आहे. त्या भाजपा शिवाय सुटू शकणार नाही, याची खात्री पटल्याने आम्ही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश केला आहे. पक्षाची प्रतीष्ठा वाढविण्याचा आम्ही निश्चीत प्रयत्न करु.
नाशिक येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी त्यांच्यासह विजय जाधव,अनील पवार, अतुल बोराडे, प्रियंका बोराडे, अक्षय नाठे, अदीत्य सांगळे, राम कर्पे, भाऊसाहेब पवार, आशा कर्पे, दीपक मोरे, अमोल वाजे, विष्णु भगत, शाम वाजे, चंद्रकांत गवळी, युगंधर वाजे, ऋषीकेश नाईक, शरद वाजे, हितेश वाजे, गणेश गर्जे,ललित तनपुरे, सागर गायकवाड, व्ही डी देशमुख, दिलीप नलावडे, नारायण शेळके, ललीत आव्हाड यांनी प्रवेश केला.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, लक्ष्मण सावजी, सुनील केदार, सुनील बच्छाव, माजी महापौर सतीश कुलकर्णी, गिरीश पालवे, प्रशांत जाधव, उदय सागळे, बंडुनाना भाबड, भरत कोकाटे, तेजस्वीनी वाजे, आदींसह पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
उदय सांगळे यांनी प्रस्ताविक केले. कुर्हाडे यांनी सुत्रसंचालन केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




