Friday, November 22, 2024
HomeराजकीयNashik Political : खोसकरांच्या कारकिर्दीत 'ठेकेदार तुपाशी, जनता उपाशी'

Nashik Political : खोसकरांच्या कारकिर्दीत ‘ठेकेदार तुपाशी, जनता उपाशी’

शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते राजू नाठे यांचा हल्लाबोल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे तालुकाप्रमुख राजू नाठे यांनी व्यक्त केला. त्याचवेळी ‘ठेकेदार तुपाशी आणि मतदारसंघातील जनता मात्र उपाशी’ अशा शब्दांत आमदार खोसकर यांच्यावर नाठे यांनी हल्लाबोल केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी माझी उमेदवारी – मुशीर सय्यद

गेल्या पाच वर्षांत इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात ( Igatpuri-Triambakeshwar Constituency) विकासकामांसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी आणला, असे हिरामण खोसकर सांगतात. मात्र, या निधीपैकी काही पैसा कामांत वापरला तर काही पैसा ठेकेदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी लाटला. त्यामुळे मतदारसंघातील जनतेसाठी अत्यावश्यक असलेली कामे प्रलंबित पडली आहेत. खोसकरांच्या कामगिरीवर नाराज असलेली मतदारसंघातील जनता यावेळच्या निवडणुकीत खोसकर यांना धडा शिकवेल, असे भाकितही नाठे यांनी केले.

हे देखील वाचा : Nashik Political : देवयानी फरांदे यांना वाढता पाठिंबा; विविध संस्था, संघटनांचे पाठबळ

हिरामण खोसकरांनी त्र्यंबकेश्वर, हरसूल, इगतपुरी, घोटी शहरासह मतदारसंघातील अनेक गांवात विकासकामांच्या भूमिपूजनाचे फलक लावले आहेत. ही सर्व कामे अपूर्ण असून काही कामे कागदावरच झाल्याचे दिसते. त्यामुळे विकासकामांसाठी मंजूर झालेला हजारो कोटींचा सरकारी निधी खोसकरांनी गिळंकृत केला की ठेकेदारांनी? असा सवाल मतदारसंघातील जनता विचारत आहे. मतदारसंघात आतापर्यंत झालेली विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : बहिणीला ओवाळणी म्हणून आमदारकी देऊ – जाधव

दरम्यान, खोसकरांनी फक्त ठेकेदारांना पोसण्याचे काम केले आहे. ठेकेदारांमुळे मतदारसंघात गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. त्या गुंडगिरीचा वापर निवडणुकीत होताना दिसत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे नाठे यांनी सांगितले. आमदार खोसकर ठेकेदार धार्जिणे असल्याचा प्रचार सोशल मीडियासह मतदारसंघात होत असताना खोसकरांची बाजू सावरण्यासाठी ‘तुपाशी’ असणारे ठेकेदारच मैदानात उतरले आहेत, असा आरोप नाठे यांनी केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या