पंचवटी | Panchvati
सत्यता, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेने नाशिक पूर्वच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प घेणारे राष्ट्रवादी (NCP) काहीस शरद पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते (Ganesh Gite) यांना भक्कम साथ देण्याचा संकल्प म्हसरूळच्या रहिवाशांनी घेतला आहे. विकासाचे दूसरे नाव गणेश गिते असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा : मतदार संघाच्या विकासासाठीच अजितदादांसोबत : ना. नरहरी झिरवाळ
महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे (Nashik East Assembly Constituency) अधिकृत उमेदवार गणेश (भाऊ) बबन गिते यांनी सोमवारी (दि. ११) मारुती मंदिर, म्हसरूळ प्रभाग क्र. १ परिसरातून प्रचारास सुरुवात केली. दौऱ्यात (Tour) मारुती मंदिर, म्हसरूळ गाव, वैदुवाडी, नायरा पेट्रोल पंप, शिवा हॉटेल, ओंकार चौक, साई मंदिर, रिलायन्स पेट्रोल पंप, संपर्क कार्यालय, आरटीओ कॉर्नर, गोरक्ष नगर, किशोर सूर्यवंशी मार्ग, कंसारा माता चौक, ए.टी. पवार आश्रमशाळा मार्ग, रोहिणी हॉटेल येथे नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
हे देखील वाचा : Nashik Political : ॲड. राहुल ढिकले पुन्हा विधानसभेत जाणार – आढाव
गितेच्या प्रचाराचा धडाका सुरू असून म्हसरूळ परिसरात (Mahasrul Area) प्रचार केल्यानंतर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अनेक माता-भगिनींकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. ज्येष्ठांकडून त्यांना विजयाचे आशीर्वाद मिळत आहेत. विविध सामाजिक संघटनांनी गिते यांना पाठिंबा दिला आहे.यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा : Nashik Political : वसंत गिते विक्रमी मतांनी जिंकणार; शिवसेना उपनेते सुनील बागुल यांना विश्वास
नाशिकला जागतिक ओळख
गणेश गिते यांनी स्थायी समिती सभापतिपदाच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारून नाशिकला क्रीडा केंद्र म्हणून ओळख निर्माण करून दिली. पेठरोडच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेऊन त्यांनी वाढत्या रहदारीचा विचार करून नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. विकासासाठी गितेंच्या पाठीशी असल्याचे मतदारसंघातील मतदारांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा