निफाड | प्रतिनिधी | Niphad
निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) जनतेच्या सुखसोयी व प्रशासकीय कामांचा निपटारा एकाच ठिकाणी होण्यासाठी नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Nashik to Chhatrapati Sambhajinagar Highway) १४ कोटी रुपये खर्च करून शासनाने निफाड प्रशासकीय इमारत बांधली आहे. परंतु या इमारतीकडे इमारत बांधत असताना निफाड तालुक्यात जवळपास सात ते आठ हजार दिव्यांग बांधव आहे. सदर प्रशासकीय इमारत ही तीन ते चार मजली असलेल्या या प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषी विभाग सब रजिस्टर सेतू कार्यालय असे विविध कार्यालय असल्यामुळे तालुका भरातून येणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी ही इमारत बांधत असताना शासनाने प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केली नाही.
हे देखील वाचा : दिंडोरी-पेठला पहिली महिला आमदार लाभणार
परंतु यात भर म्हणून तालुक्यातील माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) व विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांनीही ही इमारत पूर्ण झाल्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर म्हणा की अन्य सुखसुविधा दिव्यांग बांधवांसाठी झाल्या पाहिजे होत्या. मात्र, या आजी-माजी आमदारांनी या गरजेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिव्यांग बांधव ही प्रहार जनशक्ती पक्षाचे व स्वराज्य पक्ष ,अंगीकृत सर्व शेतकरी संघटना, रिपब्लिकन काँग्रेस पार्टी अशा परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कदि (Gurudeo Kande) यांच्याकडे लक्ष देऊन त्यांनाच विजयी करण्याचा चंग निफाड तालुक्यातील दिव्यांग बांधव यांनी बांधला आहे त्यामुळे निफाड विधानसभा निवडणुकीत दिव्यांग बांधव महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ते या निवडणुकीचे पारडे कोणाकडे फिरवतात याकडे निफाड तालुक्यातील नागरिकांचे (Citizen) लक्ष लागले आहें.
हे देखील वाचा : Nashik Political : विधानसभेतही करेक्ट कार्यक्रम करा – खा. भगरे
खेडलेझुंगेत मतदार जागृती
खाकी सूट आणि काळ्या बुटात साहेब आला आणि ताई, आक्का, दादा, भाऊ, तात्या, काका, मामा मतदान करा. मतदान नाही केले तर बंदुकीतल्या गोळ्या हातात काढुन फेकुन मारेल, अशा आरोळ्या देवुन मतदारांना मतदान करा, असे आवाहन करू लागला. हा आवाज त्या खाकी सुट आणि बूट परिधान करून आलेला बहुरुपी शिवाजी सगर होय. आपल्या विनोदी कलेतून लोकांचे मनोरंजन करुन कुटुंबांचा गाडा चालवणारा बहुरुपी बांधव सर्वश्रुत आहे. या बांधवांनी आता लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होत मतदान जनजागृती करत आहेत. मतदानाचे हे पवित्र काम असुन ते सर्वांकडून होणे गरजेचे आहे. जर लोकशाही बळकट करायची असेल तर सर्वांनी आपल्या भागातील नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन निवडणुकीचे पवित्र काम करावे, असे आवाहन शिवाजी सगर आणि त्यांचे बहुरुपी बांधव करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा