Wednesday, December 4, 2024
Homeनाशिकदिंडोरी-पेठला पहिली महिला आमदार लाभणार

दिंडोरी-पेठला पहिली महिला आमदार लाभणार

सुनिताताई चारोस्करांच्या विजयासाठी मतदार एकवटले; विरोधक हतबल

दिंडोरी –

देशाचे नेते शरद पवार यांनी शेतकरी महिला युवक यांच्यासाठी मोठे निर्णय घेतलेले असून दिंडोरी – पेठ विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एका महिलेला उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, महाविकास आघाडी यांच्यातर्फे देण्यात आल्याने नक्कीच यावेळी महिलेला संधी देऊ व दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडवून आणू असा निर्धार सर्व मतदारांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

- Advertisement -

दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता रामदास चारोस्कर यांच्या उमराळे बु. गटातील विविध गावांच्या प्रचार दौर्‍यात मतदारांचा विशेषतः महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुनिता चारोस्कर यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघासाठी इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळणार असल्याने सुनिता चारोस्कर यांना तळागाळातील महिला, आदिवासी दलित बांधव, शेतकरी, शेतमजूर यांचा मोठा पाठिंबा लाभला असून सुनिता चारोस्कर यांना विधानसभेत आमदार म्हणून पाठवणारच असा विश्वास ग्रामीण जनतेतून व्यक्त होताना दिसत आहे. सुनिता चारोस्कर यांनी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, खा. भास्कर भगरे, राजेंद्र ढगे, प्रकाश पिंगळ, पांडूरंग गणोरे, रमेश चौधरी, आप्पा वटाणे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांचे समवेत उमराळे गट व वणी गटाचा दौरा केला.

याप्रसंगी उमराळे बु. गटातील इंदोरे, मडकीजांब, जांबुटके, उमराळे बुद्रुक, वाघाड, कोकणगाव, नळवाडपाडा, ठेपणपाडा, नळवाडी, उमराळे खुर्द, पाडे निळवंडी, हातनारे या गावांना प्रचारसभा घेतल्या. त्याचप्रमाणे वणी गटातील लखमापूर, परमोरी, मावडी, संगमनेर, मुळाणे, बाबापूर, पुणेगाव, माळेगावकाजी, फोफशी, वाघळूद, दहेगाव, खेडले, पिंपरखेड, करंजवण, ओझे, म्हेळूस्के, कादवा म्हाळूंगी, वलखेड आदी गावातील मतदारांशी संपर्क साधताना त्यांनी शिक्षण आरोग्य रस्ते वीज रोजगार महागाई शेती या मूलभूत प्रश्नांसंदर्भात सर्व घटकांना न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न करू असे आश्वासन यादरम्यान दिले .

यावेळी एकंदरीतच महाविकास आघाडीच्या उमेद्वार सुनीता चारोस्कर यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला वाढता पाठिंबा बघुन विरोधक हतबल झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

सुनिताताई चारोस्करांना मतदारांची पसंती वाढली
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांना गावोगावचे शेतकरी, युवक, महिला भेटून तालुक्यातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आणून दिले जात आहे. बंद पडलेल्या पाणी योजना, भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या जल जीवन मिशनच्या योजना, निकृष्ट रस्ते, तालुक्यातील रस्त्यांची झालेली वाताहत, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, शैक्षणिक सुविधांचा अभाव या विषयावर जनतेत प्रचंड नाराजी दिसून येत असल्याने यावेळी आमदार बदललाच पाहिजे ही लोकांची भावना दिसून आली आहे . ज्या अपेक्षेने आमदार निवडून दिले जातात त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत व एकदा निवडणूक झाली की आमदार मुंबईलाच मुक्काम ठोकतात. मतदार संघात नंतर कुठेही संपर्क ठेवला जात नाही किंवा लोकांच्या समस्या ऐकून त्यावर काहीही कार्यवाही केली जात नाही त्यामुळे यावेळी जनतेत प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यावेळी सुनिता चारोस्करांना मतदारांची पसंती वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

झिरवाळांच्या प्रचारात विकासाचा मुद्दा भरकटला; मार्ग खडतर
‘माझी छाती फाडली तर शरद पवार साहेब दिसतील’ असे बोलणारे आमदार नरहरी झिरवाळांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी आपण विकासासाठी अजित दादांबरोबर गेलो असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. येणार्‍या काळात निवडणुकीला सामोरे जात असतांना मला जनतेकडे विकासाच्या मु्द्यावर पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जायचे आहे असे देखील झिरवाळांनी सांगितले होते. परंतु सध्या ते विकासाच्या मुद्द्यावर बोलतांना दिसत नाहीत. गावोगावी जावून प्रचारामध्ये विकास कामांवर बोलण्यासारखे मुद्दे नसल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींकडून नाचगाणे, जातीय मुद्दे व विरोधकांना धमकीवजा इशारे देण्याचे प्रयत्न केला जात आहे.

मी कोणती विकास कामे केली? लोकांना कोणता विकास करून दाखवला ? हे बोलण्यापेक्षा इतर मुद्द्यांना हात घालत विकासाचा मुद्दा भरकटवण्यात झिरवाळ धन्यता मानत आहेत. हे लोकांना पटलेले नसून साहेब तुम्ही विकास दाखवा, असा प्रति प्रश्न मतदारांकडून विचारला जात आहे. समर्थक मंडळी साहेबांनी केलेल्या विकासावर बोलण्याऐवजी टीका टिप्पणी करण्यामध्ये मग्न झालेले आहेत. नरहरी झिरवाळ लग्नकार्यात नाचतात परंतु विरोधक कुठे नाचतात आम्ही सांगू का ? असा प्रतिसवाल आमदार समर्थकांकडून केला जात आहे.

विरोधकांनी देखील कोण कुठे नाचतात याचा व्हिडिओ दाखवण्याचा देखील इशारा सोशल मीडियावर देत आहेत. नेमके ते व्हिडिओ कोणते असतील याची चर्चा होतांना दिसत आहे. मतदारांकडून यावर मात्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. कोण कुठे नाचले तो ‘नंगानाच’ दाखवण्यापेक्षा विकास दाखवा. वयोवृद्ध, तपोवृध्द व महाराष्ट्र ज्यांना पितृतुल्य समजतो अशा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांशी या वयात केलेली गद्दारी व शेटे साहेबांशिवाय आपण विजयी होऊ शकतो..! हा इतिहास आपण बदलायला निघालात…! हे स्वाभिमानी जनतेला आवडलेलं निश्चित नाही. स्वाभाविक मतदारांनी परिवर्तन करण्याचा जर निर्णय घेतला असेल तर यात गैर काय…? असा सवाल देखील मतदारांकडून विचारला जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या