Thursday, November 14, 2024
HomeराजकीयNashik Political : वसंत गिते विक्रमी मतांनी जिंकणार; शिवसेना उपनेते सुनील बागुल...

Nashik Political : वसंत गिते विक्रमी मतांनी जिंकणार; शिवसेना उपनेते सुनील बागुल यांना विश्वास

नाशिक | Nashik

मध्य विधानसभा मतदारसंघातील (Nashik Central Assembly Constituency) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते (Vasant Gite) यांनी रामवाडी परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी गिते यांचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. शिवसेना उपनेते सुनील बागुल यांनी उत्तर महाराष्ट्रातून वसंत गिते विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : मतदार संघाच्या विकासासाठीच अजितदादांसोबत : ना. नरहरी झिरवाळ

शिवसेनेतर्फे (Shivsena) गिते यांच्या प्रचारार्थ गोदा काठालगतच्या रामबाडी, हनुमानवाडी, आदर्शनगर, मोरेमळा परिसरातून शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी ढोल-ताशाच्या गजरात प्रचार यात्रा काढली. यावेळी शिवसेना (उच्चाठा) पक्षाचे उपनेते सुनील बागुल, प्रदेश संघटक व माजी महापौर विनायक पांडे, तसेच श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामासाहेब राजवाडे, बाळासाहेब पाठक, शंभु बागुल, गुलाब भोये, कैलास हेकरे, मनिषा हेकरे, कीर्ती दरगोडे, बाळासाहेब कोकणे, पप्पु टिळे, दिलीप मोरे, संजय थोरवे, रवी साठे, युवराज पेखळे, छोटू पाटील, युवराज जाधव आदींसह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा : नाशिक मध्यमधून फरांदेंना मिळणार मताधिक्य

नागरिकांनी (Citizen) फटाक्यांची आतषबाजी तसेच महिलांनी औक्षण करत वसंत गिते यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. वसंत गिते यांनी आजवर शहरासाठी केलेले काम सर्वांसमोर आहेत. शहराच्या विकासासाठी त्यांचे योगदान सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे ते विक्रमी मतांनी विजयी होतील. वसंत गिते यांच्या उमेदवारीला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तो प्रतिसाद मतदानाच्या रुपाने वसंत गिते यांच्या पारड्यात पडेल, असे उपजिल्हाप्रमुख मामासाहेब राजवाडे म्हणाले.वसंत गिते यांनी ४० वर्षे नाशिककरांची सेवा केली. त्यामुळे त्यांचा विजय केवळ औपचारिकता आहे. मतदार स्वयंस्फूर्तीन पाठिंबा दर्शवत असल्याचे चाळासाहेच पाठक यांनी सांगितले. बसंत गिते यांचा सर्वाधिक मतांनी विजय होईल, असा विश्वास शंभु बागुल यांनी व्यक्त केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या