Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक मध्यमधून फरांदेंना मिळणार मताधिक्य

नाशिक मध्यमधून फरांदेंना मिळणार मताधिक्य

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दोन पंचवार्षिकात प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हा मतदारसंघात पूर्वापार भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. कायमच बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघाचे सूज्ञ मतदार येत्या निवडणुकीत विक्रमी मतदान करतील. दि. 20 रोजी अनुक्रम 2 पुढील कमळ या निशाणी समोरचे बटण दाबून मोठ्या मताधिक्याने प्रा.फरांदे यांना विधानसभेत पाठवतील, असा विश्वास मतदारसंघातील सर्वसामान्य महिला, नवमतदार युवती व्यक्त करीत आहेत.

2014 व 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत आ. देवयानी फरांदे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. सलग दोन पंचवार्षिकात आमदार म्हणून जनसेवेची संधी त्यांना मिळाली. त्यांचे सोने केले. या कालावधीत त्यांनी ‘माझं नाशिक ; माझी जबाबदारी ’ ही संकल्पना राबवली. समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करून त्यांच्या मनातील अपेक्षेप्रमाणे मतदारसंघात विकास आराखडा तयार केला. तो पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. म्हणून आम्ही कायमच प्रा.फरांदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे मतदारसंघातील महिला सांगत आहेत.

नाशिक मध्य मतदारसंघातील विविध समाजघटकांशी संवाद साधला, तेव्हा सर्वांनी भाजप-महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनाच आपली पसंती असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आमचे सशक्तीकरण होणार आहे. जनतेच्या हक्काच्या पैशातून आम्हाला दरमहा 1,500 रुपये मिळवून देण्यासाठी आमदारांनी प्रयत्न केले. मतदारसंघात महिलांना सुरक्षित वाटेल, असे वातावरण एक महिला आमदार म्हणून त्यांनी केले आहे. विविध भागात मंदिरे बांधून दिली. त्यामुळे भक्तीमय प्रसन्नता, शांतता निर्माण झाली आहे. भजन, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम सातत्याने होतात. सर्वांमध्ये आपुलकीचा ओलावा व एकोपा वाढीस लागला आहे. मुलांवर चांगले संस्कार होतात. आम्ही समाधानी आहोत, असे महिलांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...