Monday, November 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : आमदार नितीन पवार यांना साथ द्या - ऋषिकेश पवार

Nashik Political : आमदार नितीन पवार यांना साथ द्या – ऋषिकेश पवार

उंबरठाण आठवडे बाजारात मतदारांच्या गाठीभेटी

उंबरठाण । प्रतिनिधी Umbarthan

सुरगाणा तालुक्यातील विरोधकांनी केवळ वन जमीनीचा एवढा एकच मुद्दा घेऊन चाळीस वर्षे आदिवासी जनतेची फसवणूक करीत सत्ता भोगली. तो प्रश्न अद्यापही कायम असून वन जमीनीचा सात बारा झाला नसून नावावर झाली नाही. गोंदुणे जिल्हा परिषद हा डांग, गुजरात राज्य लगतचा सीमावर्ती भाग हा विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे सुरगाणा तालुक्याचा समावेश केंद्र सरकारने आकांक्षित तालुक्यात केली आहे. हा एक कलंक राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीची सत्ता आल्यावर पुसून टाकण्यासाठी विधानसभेत आमदार नितीन पवार असणे गरजेचे आहे.त्यासाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीन पवार यांच्या पाठीशी उभे रहावे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन ए टी पवार इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट संस्थेचे चेअरमन, युवा नेते ऋषिकेश पवार यांनी उंबरठाण येथील प्रचार सभेत मतदारांना केले.

- Advertisement -

कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार नितीन पवार यांच्या प्रचारार्थ उंबरठाण येथील आठवडे बाजारात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आठवडे बाजारातील व्यापारी व आदिवासी बांधवांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला.ङ्गयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋषिकेश पवार यांनी सांगितले कि, मी प्रथमच सुरगाणा तालुक्यातील खेडोपाडी फिरलो.अनेक गावामध्ये रस्ते नाही, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. शिक्षण, आरोग्य, विजेचे प्रश्न आहे. गेल्या चाळीस वर्षातील विकासाचा अनुशेष केवळ पाच वर्षांत भरून निघणे शक्य नाही. विरोधकांनी एवढ्या वर्षांत मतदारांना भुलथापा मारुन विकासापासून वंचित ठेवल्याचे दिसून येते.

आमदार नितीन पवार यांनी पक्षभेद न करता खेडोपाडी स्मशान भूमी, सभामंडप, रस्ते, वीजपुरवठा, शाळा खोली, सिमेंट बंधारे या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विरोधकांकडे विकासाचे मुद्देच नसल्याने खोटे आरोप प्रत्यारोपण करीत असल्याचे श्री पवार यांनी सांगितले.ङ्गराज्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस,महायुतीची सता येणार असून सुरगाणा तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रत्येक गाव वाडी वस्तीवर विकासाची कामे केली जातील. सुरगाणा तालुक्याचा विकास कळवणच्या बरोबरीने विकास केला जाईल असे आश्वासन युवा नेते ऋषिकेश पवार यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पवार, आनंदा झिरवाळ, नवसू गायकवाड, तुळशीराम महाले, दीपक मेघा,गोपाळ धूम,राजू पाटील,, भास्कर अलबाड, युवराज लोखंडे,मनोज शेजोळे,योगेश ठाकरे,पुंडलिक खंबायत, रामदास केंगा,दीपक मेघा,रमेश बागुल, हुशार देशमुख, सुरेश वार्डे, चिंतामण वार्डे, मनोज देशमुख, रंजित गवळी, परशराम कामडी, काशिनाथ गावित सुधाकर महाले योगीराज पाडवी रामदास देशमुख गोरख महाले प्रकाश धूम सूर्यकांत जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या