Tuesday, November 19, 2024
HomeनाशिकNashik Political : विकासाच्या मुद्यावर दादा भुसेंना समर्थन; महायुतीत उत्साह

Nashik Political : विकासाच्या मुद्यावर दादा भुसेंना समर्थन; महायुतीत उत्साह

शहरातील विविध समाजांतर्फे घेण्यात आलेल्या मेळावे बैठकांमध्ये निर्णय,

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

गत २० वर्षात शहरासह तालुक्यात विविध विकासकामाद्वारे आपले नेतृत्व सिध्द करणाऱ्या पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध समाजांचा आर्थिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून देखील ठोस निर्णय घेतला आहे. त्यांच्या या भगिरथ प्रयत्नांना भक्कम पाठबळ देत विकासाबरोबर समाज उत्थानाची गंगा अविरत वाहत राहावी यासाठी शहरातील वाणी, लिंगायत, धोबी, गवळी, सोनार, कासार, गोंधळी, तेली, गुरव, सुतार, बुरूड, मातंग, भोई, लोहार, शिंपी, जैन, ब्राम्हण आदी विविध समाजासह व्यापारी संघटना तसेच रोटरी क्लबसारख्या सामाजिक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने बैठका घेत दादा भुसे यांना समर्थन जाहीर केल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग निष्कंटक झाला असल्याचे चित्र निर्माण झाल्याने महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : विधानसभेतही करेक्ट कार्यक्रम करा – खा. भगरे

मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातील (Malegaon Outer Assembly Constituency) शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय आठवले गट महायुतीचे उमेदवार पालकमंत्री दादा भुसे यांनी सुरू केलेल्या प्रचार अभियानास शहरासह तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरासह गावागावात रस्ते, आरोग्य, सिंचन, शिक्षण, पाणी, कृषी आदी विविध क्षेत्रात झालेल्या विकासकामांमुळे व लाडकी बहिण, निराधार, कामगार, शेतकरी आदी विविध घटकांसाठी मतदार संघात प्रभावीपणे राबविलेल्या योजनांमुळे भुसे यांचे नेतृत्व सिध्द झाले आहे. समाजांच्या उत्कर्षांसाठी महायुती शासनातर्फे विविध समाजाच्या आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आल्याने सर्व समाजांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले गेले आहे.या पार्श्वभूमीवर वाणी, तेली, लिंगायत, धोबी, गवळी, सोनार, गुरव, सुतार, बुरूड, मातंग, भोई, कासार आदी विविध समाजांतर्फे कृतज्ञता सोहळ्यांचे व मेळावे, बैठकांचे स्वयंस्फूर्तीने सहपरिवार आयोजन करण्यात येवून शहरासह तालुक्याचा तसेच समाजाच्या विकासाचा रथ पुढे दौडत राहावा यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या समर्थनार्थ उभे राहण्याचा निर्णय घेतला गेला. या मेळावे व बैठकांना हजारो समाजबांधवांनी विशेषतः महिलांनी दर्शवलेली उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली होती.

हे देखील वाचा : दिंडोरी-पेठला पहिली महिला आमदार लाभणार

यावेळी मार्गदर्शन करतांना भुसे यांनी आपण सर्वांनी मिळून महामंडळांसाठी पाठपुरावा केला होता म्हणून येणाऱ्या काळात या महामंडळांवर मालेगावला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. या महामंडळांव्दारे समाजातील तरूणांना व्यवसायासाठी आर्थिक सहकार्य मिळण्याबरोबर शिक्षण व इतर समस्या निराकरणासाठी देखील फायदा होणार आहे. महायुती सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक समाज घटकांचा विचार केला जावून महामंडळांची (Corporation) स्थापना करण्याचा निर्णय घेतला गेला. अवघ्या अडीच वर्षात महायुती सरकारने जनहिताच्या योजना राबविण्याबरोबर विकासकामाद्वारे राज्याला खऱ्या अथनि विकासपथावर आणले आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवांनी विकासाला प्राधान्य देत धनुष्यबाणाला आशिर्वाद द्यावा, असे आवाहन भुसे यांनी केले.

हे देखील वाचा : Nashik Political : ॲड. राहुल ढिकले यांच्या नाशिकरोड प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

समाजाबरोबर रोटरी क्लब तसेच विविध व्यापारी संघटनांनी देखील स्वयंस्फुर्तीन पुढाकार घेत मेळावे घेवून भुसेंच्या समर्थनार्थ उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील धान्य-भाजीपाला व्यापाऱ्यांची आयएमए हॉल येथे झालेल्या बैठकीत मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. गेल्या २० वर्षात विकासकामांच्या माध्यमातून भुसेंनी त्यांचे नेतृत्व सिध्द केले आहे. त्यांचे काम शुध्द सोन्यासारखे असल्याने आता बावन्नकशी सोने जवळचे करायचे की गारगोट्यांना हे आता ठरवायचे आहे. त्यामुळे भुसेंच्या पाठीशी शहराचा विकास असाच पुढे नेण्यासाठी ताकदीने उभा राहण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीत विविध मान्यवर व्यापाऱ्यांनी मनोगत व्यक्त करतांना निवडणुका येताच सक्रिय होणाऱ्या व नंतर जनतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या चुकीच्या माणसांच्या नांदी लागायचे नाही. त्यामुळे विकासासाठी भुलेंना कौल देण्याचे आवाहन केले.

हे देखील वाचा : Nashik Political : ‘प्रचंड’ विकासकामांमुळे झिरवाळांचा विजय निश्चित

व्यापारी संघटनेतर्फे (Trade Association) आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना भूसे म्हणाले, विकास तसेच शांतता अबाधित राहत शहराच्या नावलौकिकात वाढ व्हावी यासाठी विविध समाजांबरोबरच व्यापारी बांधवांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. अतोनात परिश्रम व कष्ट सर्वांनी घेतल्यामुळेच शहर विकासाकडे मार्गक्रमण करत आहे. हे चित्र असेच पुढेही कायम राहावे यासाठी ही निवडणूक आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. आगामी काळात बाजार समितीचा कायापालट करण्यासह शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी आदी बाजार घटकांना सुविधा देण्यासाठी आपण कटीबध्द राहू, अशी ग्वाही भुसे यांनी यावेळी बोलतांना दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या