Thursday, November 21, 2024
HomeनाशिकNashik Political : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला दिलासा मिळणार; 'हे' दोन...

Nashik Political : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला दिलासा मिळणार; ‘हे’ दोन तगडे नेते माघार घेणार?

नाशिक | Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) महायुती आणि महाविकास आघाडीच्या (Mahayuti and Mahavikas Aagahdi) उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपआपल्या पक्षातील बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येते हे आज अर्ज माघारीनंतर दुपारी तीन वाजेनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधी नाशिकमधील मध्य विधानसभा मतदारसंघात बंडोबांना थंड करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात (Nashik Central Assembly Constituency) महायुतीमधील भाजपकडून देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे युतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे फरांदे यांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचा उमेदवार आपला अर्ज मागे घेणार असल्याने फरांदे यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, ते आता आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! अखेर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; महाविकास आघाडीच्या मागणीला यश

तसेच महायुतीत नसले तरी भाजपला (BJP) काही मतदारसंघात साथ देणारे मनसेचे (MNS) नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही नाशिक मध्य मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला माघार घेण्याच्या सूचना दिल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघातून मनसेने जिल्हाध्यक्ष अंकुश पवार (Ankush Pawar) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, आता पवार हे माघार घेणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार फरांदे यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देर आए दुरुस्त…”

दरम्यान, नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला दिलासा मिळाला असला तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र अजूनही बिघाडी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेसच्या (Congress) डॅा. हेमलता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्या निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांची चांगलीच अडचण झाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या