Sunday, November 24, 2024
HomeनाशिकNashik Political : नाशिक पश्चिम मतदारसंघातून 'या' उमेदवारांनी घेतली माघार

Nashik Political : नाशिक पश्चिम मतदारसंघातून ‘या’ उमेदवारांनी घेतली माघार

इगतपुरीतूनही तिघांनी अर्ज घेतले मागे

नाशिक | Nashik

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) अपक्ष उमेदवारांसह महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या (Mahayuti and Mahavikas Aagahdi) वरिष्ठ नेत्यांकडून आपआपल्या पक्षातील बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येते? हे आज अर्ज माघारीनंतर दुपारी तीन वाजेनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधी जिल्ह्यातील १५ पैकी काही मतदारसंघातून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

यात नाशिक पश्चिम मतदारसंघातून (Nashik West Constituency) भाजपचे दिलीप कुमार भामरे, छावा क्रांतीवर संघटनेचे करण गायकर, महेश हिरे, शशिकांत जाधव, डॉ.डी.एल.कराड यांनी माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर करण गायकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून आपले होमग्राउंड असतानाही नाशिक पश्चिममधील अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र, नाशिक पूर्व मतदारसंघातून छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाची उमेदवारी असल्यामुळे ती कायम ठेवली आहे. या मतदारसंघात महायुतीच्या सीमा हिरे, महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर आणि मनसेचे दिनकर पाटील यांच्यात लढत होणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला दिलासा मिळणार; ‘हे’ दोन तगडे नेते माघार घेणार?

दुसरीकडे इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून (Igatpuri Assembly Constituency) भाजपचे त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव देखील उपस्थित होते. तसेच अपक्ष उमेदवार संदीप जाधव आणि अनिता घारे यांनी देखील माघार घेतली आहे. तर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार काशिनाथ मेंगाळ (Kashinath Mengal) हे जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या