Tuesday, November 19, 2024
HomeनाशिकNashik Political : सांगळे यांची शहरात अभूतपूर्व रॅली; रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी

Nashik Political : सांगळे यांची शहरात अभूतपूर्व रॅली; रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय पुजाभाऊ सांगळे (Uday Sangle) यांनी आज (दि.१८) शहरात रॅली काढून प्रचार दौरा केला. सांगळे यांनी शहरातील (City) तीनही महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी शहरातील मतदारांच्या (Voter) भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मतदारांचा त्यांना भरभरुन प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाच्या चेहप्यावर आनंद, जोश आणि विश्वास यामुळे सांगळे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार रॅलीत सहभागी तरुणांच्या गर्दीतून दिसून येत होता.

- Advertisement -

खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या उपस्थितीत आयोध्यानगरमधील प्रचार कार्यालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. बसस्थानकाजवळील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उदय व खा. वाजे यांनी पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले. त्यानंतर रॅली नेहरू चौकमार्गे गणेशपेठेत पोहोचली, तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला सांगळे व खासदार वाजे यांच्यासह सर्व कार्यकत्यांनी अभिवादन केले. त्यानंतर वावी वेस भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. रॅलीत (Rally ) ठिकठिकाणी सांगळे व खासदार बाजे यांचे महिलांकडून औक्षण करण्यात येत होते, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास मतदारांनी सांगळे यांना दिला.

सांगळे यांना कुठल्याही परिस्थितीत यंदा विधानसभेत पाठवायचेच, असे रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांकडे मतदार बोलून दाखवत होते. शहराचा विकास उदयभाऊच करू शकतात. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात के लेल्या विकासकामांतून त्याची चुणूक दाखवून दिली असल्याचे मतदार सांगळे यांना सांगत होते. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत सांगळे यांच्यासह रॅलीचे स्वागत करण्यात येत होते. रॅलीत उदय सांगळे यांचे कटाऊट घेऊन अनेक कार्यकर्ते (Activists) सहभागी झाले होते. तुतारी वाजवणारा माणूस ही सांगळे यांची निशाणी असून अनेक कार्यकर्त्यांच्या हातात तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे कटाऊट बघायला मिळत होते. या रॅलीमुळे शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

रॅलीत खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, माजी उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, शैलेश नाईक, नगराध्यक्ष किरण डगळे, उदय गोळेसर, रुपेश मुळे, पिंटू शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव राजाराम मुरकुटे, बाजार समितीचे संचालक सुनील चकोर, मंगेश आहेर,किरण कोथमिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. संजय सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, शहरप्रमुख गौरव घरटे, शिवसेना कार्यालयप्रमुख पिराजी पवार, राष्ट्रवादीचे माजी शहराग्यक्ष नामदेव कोतवाल, दीपक सुडके, शशी कालेवार, बलराम भंडारी यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

कोंडाजी मामांची सांगळे यांच्या कार्यालयाला भेट

राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे (NCP Sharad Pawar) जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी आज (दि. १८) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय पुंजाभाऊ सांगळे यांच्या आयोध्यानगरमधील प्रचार कार्यालयास भेट दिली, प्रचाराचे नियोजन व तालुक्यातील परिस्थिती याबाबत त्यांनी चर्चा केली, व शेवटचे दोन दिवस नेमके काय करायचे याबाबत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शेवटच्या दोन रात्री निवडणूकीसाठी महत्वाच्या असून आपला उमेदवार कुठेही कमी पडणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या