नाशिक | प्रतिनिधी
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रमुख मार्गाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी रॅली मार्गावर नाशिककरांनी फुलांची उधळण… फटाक्यांची आतषबाजी तसेच महिला वर्गाने औक्षण करत गिते यांना विक्रमी विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
नाशिक शहर वाचवण्यासाठी ‘भयमुक्त, ड्रग्जमुक्त, गुन्हेगारीमुक्त नाशिक’ या मोहिमेला बळ देण्याचा निर्धार नाशिककरांनी व्यक्त केला आहे. विकसित नाशिक करण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात रॅलीत सहभाग नोंदवला.
हे ही वाचा: Nashik Political: सीमा हिरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहा
शालिमार चौकातील शिवसेना मुख्य प्रचार कार्यालयापासून मोटारसायकल रॅलीस प्रारंभ झाला. याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना प्रदेश संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार नितीन भोसले, महानगरप्रमुख विलास शिंदे, मध्य नाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, उपजिल्हाप्रमुख सचिन मराठे, माजी उपमहापौर प्रथमेश गिते, उपशहर प्रमुख शाम कंगले, ऋतुराज पांडे, संजय चव्हाण, सिराज जीन, सुभाष नहार, ऋषी वर्मा, भैय्या मणियार, सुभाष शेजवळ, विनायक खैरे, वैभव खैरे, बाळासाहेब पाठक, संपतराव जाधव, संजय परदेशी, रंगरेज दस्तगीर.
हे ही वाचा: Nashik Political: अजितदादांच्या रेकॉर्डब्रेक सभेने वातावरण फिरले
करण लोणारी, संदेश फुले, सचिन बांडे, राजेंद्र क्षीरसागर, गोविंद कांकरिया, रवी जाधव, राजू राठोड, विलास घोलप, गोरख वाघ, विनोद मुंनसे, बाळासाहेब आहेरराव, वामनराव तमखाने, बंडु चाटोरीकर, संतोष कहार, मिलिंद जाधव, विभाग प्रमुख गणेश परदेशी, अॅड. पंकज जाधव, युवती सेना जिल्हा अधिकारी शिल्पा चव्हाण, कीर्ती निरगुडे, फैमिदा रंगरेज, शहर अधिकारी साक्षी विधाते, तनुश्री कदम यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई नाका येथे रॅलीचा समारोप झाला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा