Sunday, November 17, 2024
HomeनाशिकNashik Political : सर्वत्र एकच नारा, भाजप-महायुतीच्या उमेदवार प्रा. फरांदे यांना विजयी...

Nashik Political : सर्वत्र एकच नारा, भाजप-महायुतीच्या उमेदवार प्रा. फरांदे यांना विजयी करा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) मतदानाला (Voting) केवळ चार दिवस अले आहेत. त्यामुळे प्रचाराला जोर चढला असून सकाळ संध्याकाळ विविध प्रभाग पिंजून काढले जात आहेत, नाशिक मध्य विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या (Mahayuti) अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असून विक्रमी मताधिक्याने त्या विधानसभेत पोहोचतील यासाठी मतदारांचा आशीर्वाद लाभत आहे.

- Advertisement -

काल शनिवारी (दि. १६) सकाळच्या सत्रात प्रभाग क्र. २३ मध्ये दुचाकी रॅली काढण्यात आली. कमळ चिन्हाने सजवलेल्या रथावर उमेदवार प्रा. देक्यानी फरदि यांच्या समवेत भाजपा नेत्या अनिता भामरे,माजी महापौर सतिशनाना कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे, संध्या कुलकर्णी, शाहीन मिझर्झा, उदय जोशी तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले, तुलसी आय हॉस्पिटलपासून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. सुवासिनी महिलांनी (Women) औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

हॅपी होम कॉलनी, ईडन गार्डन सोसायटी, बजरंगवाडी, आनंदनगर, अशोका मार्ग, हेमराज कॉलनी, सिध्दमुनी सोसायटी, ईश्वर परेडाइज, बोधले नगर, हिलगर, गणेशबाबा समाधी स्थान येथे आल्यावर तेथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आले. रॅलीचा हा झंझावात पुढे शिवाजीवाडी, विनयनगर, दीपालीनगर, शर्मा मंगल कार्यालय, शिवसृष्टी कॉलनी येथे गेला. मार्गावरील मंदिरात दर्शन, पूजन करण्यात आले. तेव्हा हिंदुत्वाचा जयजयकार करण्यात आला. घोषणा, प्रचार गाणी व गर्जनेने सर्वत्र आगामी विजयाचे वादळ निर्माण झाले. ठिकठिकाणी महिला, ज्येष्ठ नागरिक, पुरुष व नवमतदार युवकांनी स्वागत केले.

दरम्यान, माळी समाजाचे युवा नेते संदीप विधाते यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेद्वार प्रा. देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत भाजपचे काम करण्याचा निर्णय घेतला. फरांदे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या