नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) तब्बल ७९ ग्रामपंचायत सदस्यांना (Gram Panchayat Members) अपात्र ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने (Collector Office) घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १०(१-अ) नुसार अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी ही कारवाई केली.
ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchyat Election) मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांना (Candidate) ठराविक कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर शासनाने (Government) अनेकदा मुदतवाढ दिली होती. मात्र, अंतिम मुदत संपूनही संबंधित सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी, सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.
येथील सदस्य अपात्र
सोनांबे, विंचुर दळवी, चंद्रपूर, मुसळगाव, निमगावदेवपूर, धोंडबार, सांगवी, धारणगाव, ब्राम्हणवाडे, मळखु, देशवंडी, निहऱ्हाळे, चिंचोली, सोनारी, मेंढी, औंढेवाडी, आटकवडे, सावतमाळीनगर, दत्तनगर, पांगरी बु., कोनांबे, बेलू, चास, पिंपळे, बोरखिंड, आडवाडी, मलढोण, जामगाव, रामनगर, धोंडवीरनगर, दुशिंगपूर वडझिरे, हिवरे, केपानगर, यशवंतनगर, वडगाव सिन्नर, नळवाडी, खंबाळे, पाथरे बु., कुंदेवाडी, सोनगिरी कणकोरी, चोंढी, पुतळेवाडी, शिवडे, आशापुरी, घोटेवाडी, फदार्पूर, दहीवाडी, दातली, पिंपळगाव, भरतपूर, दोडी खु., कोमलवाडी, सरदवाडी, पांढुर्ली आदी.





