Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Politics : ठाकरेंच्या शिवसेनेने विजयी गुलाल उधळला; एक उमेदवार बिनविरोध

Nashik Politics : ठाकरेंच्या शिवसेनेने विजयी गुलाल उधळला; एक उमेदवार बिनविरोध

निवडीची अधिकृत घोषणा बाकी

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थगित झालेल्या चार प्रभागांतील जागांसाठी अर्ज माघारीची मुदत बुधवारी (दि.१०) संपली. प्रभाग ५ मधील शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचे उदय गोळेसर यांच्यासमोरील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भालेराव यांनी यापूर्वीच माघार घेतल्याने गोळेसर यांच्या बिनविरोध (Unopposed) निवडीची अधिकृत घोषणा बाकी आहे. तर प्रभाग १० मधील राष्ट्रवादीचे ब्रह्मानंद कोंबरणे यांनी आज माघार घेतल्याने या प्रभागात दुरंगी लढत होणार आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने (Election Commission) प्रभाग २ अ, ४ अ, ५ अ व १० ब मधील निवडणूक स्थगित केली होती. नगराध्यक्षासह २७ जागांची मतदान (Voting) प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने २० डिसेंबर रोजी या चार प्रभागांसाठी मतदान घेण्याचे जाहीर करत नवीन निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार अर्ज माघारीसाठी (दि.१० डिसेंबर) अंतिम मुदत होती. दोन उमेदवारांची माघार झाल्याने आता चार जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

YouTube video player

प्रभाग २ अ मध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) शीतल सुनील कानडी यांची लढत शिवसेना उबाठा गटाच्या सविता खंडेराव कानडी यांच्याशी होईल. प्रभाग ४ अ मध्ये शिवसेना उबाठाच्या आशा माणिक जाधव, शिवसेना शिंदे गटाच्या शोभा राजेंद्र जाधव व राष्ट्रवादीच्या संध्या अशोक जाधव यांच्यात तिरंगी लढत होईल. प्रभाग १० ब मध्ये शिवसेना उबाठा गटाचे सोमनाथ पंढरीनाथ पावसे, भाजपचे अनिल अशोक सरवार व अपक्ष अक्षय अशोक चकोर यांच्यात तिरंगी लढत होईल. गुरुवारी (दि.११) सकाळी ११ वाजता अंतिम मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येऊन अपक्ष उमेदवाराला चिन्हाचे वाटप करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाने खाते उघडले

प्रभाग ५ मध्ये उदय गोळेसर यांची बिनविरोध निवड झाल्याने खा. राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा गटाने गोळेसर यांच्या माध्यमातून नगरसेवकपदाचे खाते उघडले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्षपदासह ३० जागांसाठी उमेदवार दिले होते. तर ५ ब मधील जागा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला सोडली होती. राष्ट्रवादी अजितदादा गटाने प्रभाग ५ मध्ये दिलेले उमेदवार युगेन क्षत्रिय यांनी यापूर्वीच माघार घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला ३० पैकी फक्त २९ जागांवरच उमेदवार देता आले होते. त्यातील प्रभाग १० मधील कोंबरणे यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीला केवळ २८ जागांवरच उमेदवार देता आल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : हार्वेस्टरद्वारे ऊस कापणीमुळे उत्पादनात घट नाही

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रति एकर सुमारे 15 टन उस उत्पादनात घट होते, अशी विनाकारण चर्चा घडवून आणण्यात येत आहे....