Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकSunil Kedar : "नगरसेवकपद सोन्याचे अंडे देणारी…"; भाजप शहराध्यक्षांनी थेट मुद्द्यालाच हात...

Sunil Kedar : “नगरसेवकपद सोन्याचे अंडे देणारी…”; भाजप शहराध्यक्षांनी थेट मुद्द्यालाच हात घातला, नेमकं काय म्हणाले?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

यापूर्वीचे कामकाज पहाता काही नगरसेवकांनी नाशिकच्या (Nashik) नावाला व विकासाला गालबोट लागेल असे कामकाज केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचे (Nashik NMC) नूतन नगरसेवकांनी हे पद सेवेचे माध्यम असून ते सोन्याचे अंडे देणारी कोंबडी नाही अशा भावनेने काम करावे, असे मत भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने भरघोस असा निधी केंद्र व राज्य सरकार नाशिक जिल्ह्याकरिता (Nashik District) देणार आहे. हा निधी चांगल्या प्रकारे सत्कारणी लागावा व चांगल्या दर्जाची कामे व्हावी ही माफक अपेक्षा नाशिककर जनतेची आहे. यापूर्वी नाशिक महानगरपालिका सुशिक्षित गुंडांचा अड्डा अशा स्वरूपाचे आरोप व प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या आहेत. त्याला तसे कारणेही होतीच. पण आपल्याला जर खरोखर सर्वसामान्य जनतेच्या प्रति बांधिलकी असेल व नाशिकचा चौफेर विकास करायचा असेल तर वैयक्तिक स्वार्थ बाजुला ठेवून काम करावे लागेल, असे केदार यांनी म्हटले.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : महापौर पदासाठी भाजप खेळणार ‘हा’ मोठा डाव; नेमकं काय घडणार?

तसेच नाशिकला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी जाहीर सभेत नाशिकच्या विकासकामाबाबत मुद्दे मांडले होते व आगामी काळात धार्मिक, कृषी, औद्योगिक, शिक्षण, सहकार, आय टी हब, वाईन कॅपिटल इ. सह सर्वच क्षेत्रात नाशिक देशाच्या व जगाच्या नकाशावर कसे झळकेल त्यादृष्टीने नगरसेवकांनी काम करावे असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते, असेही सुनील केदार म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मागील काळात नाशिकमध्ये भूमाफिया, गँगवार, टोळीयुद्ध, भूखंड घोटाळे, बदनाम झालेले सहकार क्षेत्र, लूट करून बंद पाडलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी साखर कारखाने अशा एक ना अनेक प्रकारे नाशिकचे नाव बदनाम झाले होते. आता त्यावर मात करून पुढील ५ वर्षे चांगले कामे करावी. जेणेकरून नाशिक प्रगतीच्या दिशेने जाईल एक चांगला संदेश जनतेत जाईल. भारतीय जनता पक्षात नेहमी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या कामांचे मुल्यमापन केले जाते व त्यानुसार पुढील दिशा ठरवली जाते. त्यामुळे नवनियुक्त नगरसेवकांनी जनतेचे सेवक म्हणून समर्पित भावनेने जनतेची कामे करावी व भाजपचा (BJP) अपूर्ण राहिलेला १०० प्लसचा नारा पुढील वेळेस पुर्णत्वास नेण्याचा दृष्टीने कामाला सुरुवात करावी, असे केदार यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : Nashik Crime : कथित चारशे कोटी लूटप्रकरणी गांधी अटकेत; ‘एसआयटी’ करणार उलगडा, कर्नाटकचे पोलिस नाशकात

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...