Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Politics : मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Nashik Politics : मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे - छाजेड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी (NMC Election) काँग्रेसनेही (Congress) स्वबळाचा नारा दिला आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, ही निवडणूक पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची आहे. या निवडणुकीमध्ये पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिले आहे. नाशिक शहर काँग्रेस (Nashik City Congress) पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी (दि.२४) काँग्रेस भवनमध्ये झाली, त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी छाजेड म्हणाले की, काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुकी करता तयार आहे. पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, तो काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते निष्ठेने पाळतील. ही निवडणूक पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची असून, सर्व निष्ठावानांना न्याय मिळेल. काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यास सज्ज आहे आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे निष्ठेने पालन केले जाईल. ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई यांनी प्रभागनिहाय बैठका घेऊन इच्छुक उमेदवारांच्या (Candidate) मुलाखती लवकरच घेतल्या जातील आणि अर्ज छाननी समिती कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

YouTube video player

तर प्रदेश सचिव राहुल दिवे (Rahul Dive) यांनी काँग्रेसचा विचार लोकांमध्ये रुजला असून, अफवांवर विश्वास न ठेवता सर्व उमेदवार निवडणूक जिंकतील आणि सत्ता काँग्रेसशिवाय कोणी स्थापन करणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. प्रदेश काँग्रेस सचिव ज्ञानेश्वर गायकवाड यांनी देशात परिवर्तनाची लाट असून, नाशिक मागे राहणार नाही, असे सांगत कार्यकर्त्यांनी लोकांच्या दैनंदिन समस्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. तर ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक अण्णा पाटील यांनी नवीन नाशिक भागात काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी कार्यकर्ते जोमाने काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.

निषेधाचा ठराव

यावेळी माजी मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या प्रकाराचा निषेध ठराव बैठकीत पारित करण्यात आला. यावेळी भालचंद्र पाटील, माजी नगरसेविका वत्सला खैरे, आशा तडवी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सातपूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक खोडे आणि कोलाप्पा धोत्रे यांच्यासह अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बैठकीला स्वाती जाधव, हनीफ, संतोष ठाकूर, गौरव सोनार, संदीप शर्मा, विजय पाटील, उद्धव पवार, दिनेश निकाळे, माया काळे, कैलास कडलक, नंदकिशोर सूर्यवंशी, सॅम्युअल अवताडे, माजी नगरसेवक पोपटराव हगवणे, जावेद इब्राहिम, मतीन पटेल, कामील इनामदार, रोहन कातकाडे, धोंडीराम बोडके, अशोक लहांगे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरु – मंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न...