Tuesday, January 6, 2026
HomeराजकीयNashik Satana Politics : शिवसेनेसाठी सामान्य माणूस केंद्रबिंदू, बेकायदेशीर घरपट्टी कमी केली...

Nashik Satana Politics : शिवसेनेसाठी सामान्य माणूस केंद्रबिंदू, बेकायदेशीर घरपट्टी कमी केली जाईल – उपमुख्यमंत्री शिंदे

सटाणा | Satana

शिवसेनेसाठी (Shivsena) सामान्य माणूस केंद्रबिंदू असून, शहरवासीयांच्या दृष्टीने जिव्हाळाचा प्रश्न असलेली बेकायदेशीर घरपट्टी राज्याच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून कमी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.

- Advertisement -

येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हर्षदा पाटील यांच्यासह प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील पाठक मैदानावर आयोजित सभेत बोलताना शिंदे यांनी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या लोकाभिमुख कार्याचा आदर्श जोपासत नगरपरिषदेच्या सेवा सहकार्य समृद्धीच्या ब्रीदवाक्यानुसार प्रशासनाचे काम अपेक्षित असल्याचे सांगितले.

YouTube video player

शिंदे यांनी बोलताना शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसह विकासाच्या अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करीत, यात लेक लाडकी, शेतकरी सन्मान योजना, तसेच मुलींचे शिक्षण मोफत होत असल्याचे सांगितले. शहरासह परिसरातील राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती करण्यासह शहरातील पुनद योजनेचा पाणीप्रश्न, देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाचे प्रलंबित काम, भुयारी गटारी आदी कामांना गती देण्याचे आश्वासन दिले.

सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री- शिर्डी रस्त्याचे प्रलंबित असलेले काम मार्गी लावण्याबरोबरच बायपास रस्त्याचा प्रश्नही सोडविला जाणार आहे. रस्त्यांच्या कामासाठी आज पावतो 67 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, प्रशिक्षण योजना यासारख्या महत्वपूर्ण अशा योजना राबवलेल्या आहेत. प्रसंगी शासकीय नियम शिथिल करून शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहिलो आहे.हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मी चेला आहे. जे बोलतो तेच मी करतो. सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो नाही तर सर्वांना सोन्याचे दिवस आणण्याच्यासाठी आलो आहे असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, हर्षदा पाटील, राहुल पाटील, यतीन पाटील, संजय सोनवणे, सुनील महाजन, प्रशांत बच्छाव, दिनेश सोनवणे, जतीन कापडणीस, सुभाष नंदन, सुनील पाटील, जिभाऊ सोनवणे, अरविंद सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, रत्नाकर सोनवणे,अरुण सोनवणे, दीपक नंदाळे, सुशीला रौंदळ, किरण कर्डीवाल, जयश्री गरुड, अनिल सोनवणे, भूषण सोनवणे, तनुजा नांद्रे, अरीफ कासिम, विद्या सोनवणे, वैशाली निकम, कोमल मोरकर, सागर पगार, रोहिणी सोनवणे, जगदीश मुंडावरे, योगिता भामरे, कल्पना सोनवणे अनिता सोनवणे, उदय सोनवणे आदींसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय दुसाने यांनी सूत्रसंचालन केले व हर्षदा पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...