Saturday, January 24, 2026
HomeनाशिकNashik Politics : बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाविरोधात आमदार हिरेंसह माजी नगरसेवकांचे पक्षश्रेष्ठींना...

Nashik Politics : बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाविरोधात आमदार हिरेंसह माजी नगरसेवकांचे पक्षश्रेष्ठींना साकडं

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सुधाकर बडगुजर (Sudhakr Badgujar) यांना भाजपमध्ये (BJP) प्रवेश देऊ नये, याकरिता आ. सीमा हिरे (MLA Seema Hiray) यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत (Mumbai) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले.

- Advertisement -

शिवसेना उपनेते पदावरून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा असल्याने आ. सीमा हिरे यांनी उघडपणे बडगुजरांच्या प्रवेशाला पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला होता. दरम्यान मंगळवारी (दि. १०) आ. सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांसह (Corporators) भाजप पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेत्याची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, २२ वर्षांत बडगुजरांवर २९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात त्यांना दीड वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

YouTube video player

दरम्यान, मुंबई बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी दाऊद, सलीम कुत्ता या देशद्रोह्यांशी संबंध आहेत. त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई देखील झाली आहे. या निवेदनात बडगुजर यांच्याविरुद्ध पोलीस ठाणेनिहाय (Police Station) गुन्ह्यांची यादी देण्यात आली. यावेळी सर्व ज्येष्ठांनी यावर विचार करण्याचे आश्वासन दिले.

या पदाधिकाऱ्यांचा विरोध

आ. सीमा हिरे यांच्यासह ॲड. श्याम बडोदे, माधुरी बोलकर, भगवान दोंदे, सतीश सोनवणे, कावेरी घुगे, प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, अलका अहिरे, पुष्पा आव्हाड, राकेश दोंदे, मुकेश शहाणे, दिपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे आदी माजी नगरसेवकांसह मंडल अध्यक्ष व पदाधिकारी यांचा बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...