Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Politics : माजी महापौर अशोक मुर्तडक, दशरथ पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Nashik Politics : माजी महापौर अशोक मुर्तडक, दशरथ पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

माजी आमदार नितीन भोसलेंनीही घेतलं धनुष्यबाण हाती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ऐन महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) आणि शिवसेनेचे (एकत्रित असताना) माजी महापौर दशरथ पाटील (Dashrath Patil) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला आहे. ठाणे येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, यावेळी मंत्री दादा भुसे आणि माजी खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. तसेच माजी आमदार नितीन भोसले यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

- Advertisement -

मनसेचे माजी महापौर असलेल्या अशोक मुर्तडक यांनी विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर मुर्तडक यांनी प्रभाग क्रमांक ५ ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत शड्डू ठोकला. त्यांना लागलीच शिंदेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला होता. यानंतर त्यांनी आज अधिकृतपणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची लढत माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्याशी होणार आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

तर माजी महापौर दशरथ पाटील यांनी देखील दीड वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने मुलाला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु,ऐनवेळी मनसेचे (MNS) माजी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दशरथ पाटील यांच्या मुलाचा पत्ता कट झाला. त्यानंतर भाजपने प्रभाग क्रमांक ९-ड मधून दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांना उमेदवारी दिली. तर दशरथ पाटील यांनी मुलगा प्रेम पाटील याचा मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून घेत उमेदवारी मिळवून दिली. मुलाचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर आज (मंगळवारी) दशरथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला.

दरम्यान, दशरथ पाटील यांनी २००३-०४ साली तर अशोक मुर्तडक यांनी २०१५-१६ साली झालेल्या सिंहस्थात नाशिक महापालिकेचे महापौर (Mayors) म्हणून कामकाज बघितले होते. त्यानंतर आता या दोन्ही माजी महापौरांनी पुढील वर्षी होणार्‍या सिंहस्था आधीच शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याने त्यांच्या सिंहस्थामधील कामकाजाच्या अनुभवाचा फायदा पक्षाला नाशिक महापालिकेत सत्ता आल्यास होऊ शकतो.

हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिका निवडणुकीत बिग फाईट; ‘या’ प्रभागांमध्ये वातावरण टाईट

नितीन भोसलेंचाही शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे सचिव राजेंद्र लिंबाळते, नाशिक ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे प्रशांत ठाकरे, युवराज भोसले, सचिन सोनवणे, प्रसाद आंबेकर, अनुप भोसले, पृथ्वीश भोसले यांनी देखील भगवा झेंडा हाती घेतला. नितीन भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

ताज्या बातम्या

ठाकरे

“तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?”;...

0
मुंबई | Mumbaiराज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. विविध पध्दतीही राबवल्या...