Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकVasant Gite : खासदार वाजेंना १०० कोटी आणि केंद्रात राज्यमंत्रीपदाची ऑफर; माजी...

Vasant Gite : खासदार वाजेंना १०० कोटी आणि केंद्रात राज्यमंत्रीपदाची ऑफर; माजी आमदार गितेंचा मोठा गौप्यस्फोट

नाशिक | Nashik

सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Sinnar Nagarparishad Election) निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचा प्रचार शुभारंभ प्रसंगी निष्ठावंतांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी भाजपावर शरसंधान करताना मोठा गौप्यस्फोट देखील केला. खासदार राजाभाऊ वाजे यांना सत्ताधारी पक्षाकडून कशा ऑफर येत आहेत, याबाबत त्यांनी वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलताना माजी आमदार गीते यांनी राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) सारखा खासदार नाशिकला (Nashik) मिळाला हे नाशिकचे भाग्य असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले, ” १०० कोटी आणि केंद्रात राज्यमंत्रीपद अशी ऑफर खासदार राजाभाऊ वाजे यांनी धुडकावून लावली आहे. अशा या निष्ठावंत आणि नीतीवंत नेत्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली असल्याचे देखील त्यांनी म्हटले. गीते यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

YouTube video player

वाजे कुटुंबाने सिन्नरसाठी वाहून दिलं

नुकतेच भाजपाने (BJP) वाजे यांच्या कुटुंबातील सदस्याला फोडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी बहाल केली. याबाबत संताप व्यक्त करताना वसंत गीते म्हणाले की, किती पाठीत खंजीर खुपसायचा, एवढी विकृत बुद्धी कशी असू शकते असा सवाल त्यांनी केला. तसेच ज्या कुटुंबाने या सिन्नरसाठी आपलं सर्वस्व वाहून दिलं त्यांना त्रास दिला जातोय, असेही गीते यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...