Tuesday, January 6, 2026
HomeराजकीयNashik Politics : नाशकात मनसेला धक्का; माजी नगरसेविकेचा भाजपमध्ये प्रवेश

Nashik Politics : नाशकात मनसेला धक्का; माजी नगरसेविकेचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक | Nashik

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आजपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत प्रचार सभांची सुरुवात होणार आहे. शहरातील श्रद्धा लॉन्स, जुना गंगापूर नाका, हनुमानवाडी रोड येथून प्रचार सभा सुरु होणार आहेत. त्यापूर्वी श्रद्धा लॉन्स येथे पदाधिकार्‍यांचा मेळावा पार पडत असून, यात मनसेच्या माजी नगरसेविकेसह इतर पक्षांच्या काही पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Girish Mahajan : “कोण खरे आहे ते…”; उमेदवारीवरून गोंधळ घालणाऱ्यांना मंत्री महाजनांनी दिला इशारा

YouTube video player

मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे (Sujata Dere) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डेरे यांना नाशिक महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक १२ क मधून मनसेकडून उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, त्यांना शिवसेना (उबाठा) च्या उमेदवारासाठी माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्या नाराज झाल्याचे बोलले जात होते. यानंतर आज (रविवारी) त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हे देखील वाचा : शब्दगंध : स्मरण – महाराष्ट्राचे लोकनेते दोन बाळासाहेब

दरम्यान, नाशिकमध्ये भाजपात उमेदवारीवरून प्रचंड आक्रोश झाला होता. निष्ठावंतांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांना घेराव घालत त्यांना गाजर भेट दिले होते. यामुळे एकप्रकारे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी उफाळून आली होती. दुसरीकडे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून देखील प्रत्येक पक्षात नाराजी दिसून आली.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...