Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Politics : आदिवासी विकास महामंडळाचा पहिला निकाल जाहीर; गोकुळ झिरवाळ, इंद्रजीत...

Nashik Politics : आदिवासी विकास महामंडळाचा पहिला निकाल जाहीर; गोकुळ झिरवाळ, इंद्रजीत गावित विजयी

नाशिक | Nashik

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे सुरगाणा मतदारसंघाचे माजी आमदार जे. पी. गावित यांचे चिरंजीव इंद्रजीत गावित (Indrajeet Gavit) हे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत नाशिक गटातून संचालकपदी निवडून आले आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या १७ जागांसाठी शुक्रवार (दि.१५) रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आज या निवडणुकीची मतमोजणी जुन्या आग्रा रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्या सभागृहात पार पडत आहे. या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, त्यामध्ये नाशिक गटातून झिरवाळ आणि गावित विजयी झाले आहेत.

- Advertisement -

गोकुळ झिरवाळ आणि इंद्रजीत गावित यांनी एकाच पॅनेलमधून निवडणूक (Election) लढवली होती. त्यात १६३ मतांपैकी झिरवाळ यांना १०७ तर गावित यांना ८७ मते मिळाली. दोघांनाही पॅनेलमध्ये सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी नाशिक गटात माजी आमदार शिवराम झोले आणि महामंडळाचे माजी संचालक आनंदा चौधरी यांच्या पॅनेलचा पराभव केला. तर या निवडणुकीत आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर आणि मनोहर चौधरी यांनी शेवटच्या टप्प्यात झिरवाळ आणि गावित यांना पाठिंबा जाहीर केला होता. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच या दोघांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

YouTube video player

दरम्यान, आदिवासी विकास महामंडळाच्या १७ जागांसाठी ६४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. यानंतर माघारीच्या अंतिम दिवशी अहिल्यानगर-पुणे-रायगड व अमरावती या गटातील जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात होते. त्यानंतर शुक्रवार (दि.१५ रोजी) १६ केंद्रांवर ९६.१२ टक्के मतदान झाले होते. यात, नाशिक गटासाठी असलेल्या १६३ मतदारांपैकी १६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याशिवाय नऊ केंद्रावर १०० टक्के मतदानाची नोंद झाली होती. सन २०१० नंतर निवडणुक होत असल्याने या निवडणुकीसाठी यंदा इच्छूकांची मोठी भाऊगर्दी झाली होती.

ताज्या बातम्या

BJP News : भाजपला निवडणूक आयोगाचा मोठा दणका! प्रचार गीतावर आक्षेप,...

0
मुंबई । Mumbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ शेवटचे सात दिवस शिल्लक...