Saturday, January 24, 2026
HomeराजकीयNashik Politics : पक्षांतराचे पेव; भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

Nashik Politics : पक्षांतराचे पेव; भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

सातपूर | रवींद्र केडिया | Satpur

सातपूर परिसरात (Satpur Area) आगामी महापालिका निवडणुकांच्या (NMC Election) पार्श्वभूमीवर राजकीय खळबळ उडाली आहे. मागील तीन महिन्यांत सातपूर विभागातून तब्बल आठ माजी नगरसेवक आणि सुमारे ४० प्रमुख स्थानिक कार्यकर्ते इतर पक्ष सोडून नव्या गटात सामील झाले आहेत. यामुळे सातपूरमध्ये पक्षांतराचे पेव फुटल्याचे स्पष्ट दिसत आहे. याच मालिकेत रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे महानगप्रमुख विलास शिंदे यांच्यासह पाच माजी नगरसेवक शेकडो पदाधिकाऱ्यांसह व २० सरपंचांसमवेत ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिदेगटात इनकमिंग वाढली शिवसेना (शिंदे गट) सध्या सातपूर परिसरात सर्वात आक्रमक मोडमध्ये असून, पक्षबांधणीसाठी माजी नगरसेवक, माजी समिती सदस्य, महिला पदाधिकारी यांना आपल्या गोटात आणण्यावर भर दिला जात आहे.

- Advertisement -

सातपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटात (Shinde Group) इनकमिंग सुरू आहे. नुकतेच शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ नगरसेवक मधुकर जाधव, योगेश शेवरे, इंदुबाई नागरे, भागवत आरोटे, हर्षदा गायकर, सीमा निगळ हे अगोदरच शिंदे गटात डेरे दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ रविवारी (दि.१९) बाळा माजी महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गंगुई उषा शेळके, भाजपच्या (BJP) पल्लवी पाटील हेदेखील प्रवेश घेत असल्यामुळेमागील महापालिकेच्या सभागृहातील सातपूर विभागाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळजवळ सर्व नगरसेवक शिंदे सेनेत दाखल होत असल्याचे चित्र आहे. या प्रवेश कार्यक्रमांमध्ये मंत्री दादा भुसे, उपनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

YouTube video player

भाजपचा व्यूहरचना विस्तार

भाजपने औद्योगिक भागांमध्ये व्यापारी आणि उद्योजक वर्गावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी भाजप सोडून मनसेमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या भागातून कार्यकत्यांची मोठी फौज पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करण्यात आला आहे. त्यात माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, समाधान देवरे, बाळासाहेब जाधव, बजरंग शिंदे, दिनकर कांडेकर, बाळा जारे, तुषार भंदुरे, गणेश मौले, बिलास गायकवाड, संदीप तांबे आदींसह सातपूरमधील तब्बल १५० पेक्षा अधिक स्थानिक स्वयंसेवकांनी भाजपत प्रवेश घेतला आहे. याकामी आ. सीमा हिरे, महेश हिरे, प्रदेश सचिव रामहरी संभेराव, मंडल अध्यक्ष नारायण गायकवाड, भगवान काकड यांनी प्रयत्न केले.

राष्ट्रवादीत गटबाजी, गोंधळाचे वातावरण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये समन्वयाचा अभाव दिसतो आहे. अनेक पदा‌धिकारी युवानेते शिंदे गट च भाजपकडे झुकले असून, काही बॉडीमध्ये शरद पवार गटाचा प्रभाव टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव

काँग्रेसकडून सातपूरमध्ये फारशी चळवळ दिसून येत नाही. तथापि, काही ठिकाणी कार्यरत असलेले जुने कार्यकर्तदेखील पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. प्रत्यक्षात कणखर नेतृत्वाचा अभाव आणि गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.

जनतेचे लक्ष स्थानिक मुद्यांवर

जनसामान्यांचे प्रश्न मोजके आहेत. त्यांना राजकारणापेक्षा स्थानिक प्रश्न सोडवणे महत्वाचे आहे. त्यांच्याकडून रस्ते व वाहतूक व्यवस्था सुधारणा, पिण्याच्या पाण्याचा तुखडा, औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि नालेसफाई यांसारख्या प्रश्नांची आंत त्यांना आहे. या स्थानिक राजकारणावर ते कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

राजकीय स्थिती

सातपूर परिसरातील सुमारे नऊ प्रभागांमध्ये १.८५ लाख मतदार आहेत, ज्यात ४५ टक्के औद्योगिक भाग, ३५ टक्के रहिवासी वसाहती आणि २० टक्के निमशहरी बस्ती आहेत. यामुळे येथे मतांची समीकरणे अत्यंत संवेदनशील आहेत. मतदारांचा कल केवळ पक्षांनिष्ठेवर नव्हे तर उमेदवाराच्या कामगिरीवर अवलंबून आहे. यापूर्वी भाजपचे ९, शिवसेनेचे (उबाठा) ८, मनसेचे २ तर रिपाइंचे एक असे पक्षीय बलाबल होते. आता यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पूर्वी सातपूर काँग्रेसचा नंतर शिवसेनेचा बालेकिला राहिला होता. मागे भाजप-सेनेचे बलाबल सारखे होते. आता त्यात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.

सातपूर शिवसेनेचे भवितव्य धोक्यात

एकेकाळी अशोक काका गवळी यांच्यामुळे सातपूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. कालांतराने विलास शिंदे यांच्या नेतृत्वातून बालेकिल्ला बांधण्यात यश मिळाले. मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचे ८ नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे ९ नगरसेवक, मनसेचे २ व रिपाइंचे एक असे बलाबल होते. सद्यस्थितीत विलास शिंदे व त्यांचे पाच सहकारी माजी नगरसेवक शिंदेसेनेत दाखल होत आहेत. त्याचवेळी सातपूर परिसरातून निवडणुकीसाठी इच्छुक असणारे बरेच उमेदवार व प्रबळ दावेदार पक्ष सोडून जात असल्याने नव्याने कार्यकर्त्यांची जोडबांधणी करणे व उमेदवारांची तयारी करणे शिवसेना उबाठा पक्षासाठी आव्हान ठरणार आहे. सद्यस्थितीत सातपूर परिसरात शिंदे गट आणि भाजप यांचेच वर्चस्व वाढताना दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात येथील एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या प्रकाराने शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने...