Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : मंत्री भुजबळांचा गोंदियाला ध्वजारोहणासाठी जाण्यास नकार; फडणवीसांचा तडकाफडकी निर्णय,...

Nashik Politics : मंत्री भुजबळांचा गोंदियाला ध्वजारोहणासाठी जाण्यास नकार; फडणवीसांचा तडकाफडकी निर्णय, महायुतीमध्ये धुसफूस

नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी 'या' नेत्याची फिल्डिंग

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाशिक आणि रायगडच्या (Nashik and Raigad) पालकमंत्रिपदावरून वाद सुरु आहे. रायडच्या पालकमंत्रिपदासाठी शिंदेंची शिवसेना तर नाशिकसाठी राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही आहे. नुकतीच राज्य सरकारकडून स्वातंत्र्यदिनी कुठला मंत्री कुठे ध्वजारोहण (Flag Hoisting) करणार याची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत. यानंतर आता नाशिकच्या ध्वजारोहणामुळे महायुतीमधील मानापमान नाट्य चव्हाट्यावर आले.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यंदाचा नाशिकमधील (Nashik) ध्वजारोहणाचा मान न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यदिनी छगन भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्याचा ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे. पंरतु, भुजबळ यांनी गोंदियाला (Gondiya) जाण्यास नकार दिला आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असतानाही, गोंदियाला ध्वजारोहणाला का जायचं? अशी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

YouTube video player

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी गोंदियाला ध्वजारोहण करण्यासाठी जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना कळवले आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियाची जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangal prabhat Lodha) यांच्यावर सोपवली आहे.

नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुजबळांची फिल्डिंग

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. त्यानंतर आता यात राष्ट्रवादीने देखील उडी घेतली असून, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी पालकमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमधील पालकमंत्रीपदाच्या वादात भाजप-शिवसेनेतील जुना वाद विसरला जाऊन आता ‘नवा वाद’ पेटण्याची चिन्हं आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...