Thursday, February 19, 2026
HomeराजकीयChhagan Bhujbal : अजितदादांच्या विमान अपघातावर कितीही शंका घेतल्या तरी…; रोहित पवारांच्या...

Chhagan Bhujbal : अजितदादांच्या विमान अपघातावर कितीही शंका घेतल्या तरी…; रोहित पवारांच्या आरोपांनंतर भुजबळांचे रोखठोक मत

येवला | वार्ताहर | Yeola

दिवंगत अजितदादांच्या विमान अपघातावर (Plane Crash) कोणी कितीही आणि काहीही शंका निर्माण केल्या तरी माझे म्हणणे इतकेच आहे की, शंका, पुरावे असतील तर वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआयच्या (CBI) चौकशीची मागणी केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना मीही सांगतो की तुम्ही पण चौकशी करा. ज्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यांनी तपास यंत्रणांना ती माहिती दिली पाहिजे. चौकशी करून त्यात किती तथ्य आहे ते समजेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

- Advertisement -

आज, गुरुवारी,(दि. १८) येवला दौऱ्यावर आलेले मंत्री भुजबळ यांनी आपल्या संपर्क कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी अजित पवारांचे (Ajit Pawar) पुत्र जय पवार यांच्या ‘ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही’ या विधानावर बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही हे खरे आहे. स्फोट झाले, आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्यामुळे थोडसं ते खराब झालं असेल. प्रफुल्ल पटेल यांचे काल (बुधवारी) मी थोडे ऐकले. अशा परिस्थितीत अमेरिकेत यंत्रणा आहेत. ब्लॅकबॉक्स मधली जे गूढ आहे ते शोधून काढू शकते. सगळ्या बाजूने आपण प्रयत्न करू. राज्य व केंद्र सरकार यामध्ये पूर्णपणे काळजी घेत आहेत. कोणाच्या काही चुका आहे का? मुद्दामहून कोणी काही केलं का? हा एक भाग आहे. दुसरा भाग पायलटने काही चूक केली का? विमानामध्ये रडारमध्ये काही चुका झाल्या का? दोन्ही मार्गाने चौकशी होईल. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असेही ते म्हणाले.

YouTube video player

विलीनीकरण झालं सुद्धा नाही अन् …

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र आल्यानंतर अजित पवार यांना संघटनेत अनेक बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. या रोहित पवारांच्या विधानावर बोलतांना भुजबळ म्हणाले, विलीनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कोणत्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होत. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ही ठरलं असेल. राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे देखील ठरले असेल. कोणी काही सांगितलं तर आपण त्याच्यावर काय बोलणार, अशी उपहासात्मक टिप्पणी केली. तसेच रोहित पवार म्हणतात त्यांच्यासोबत अजितदादांनी काही ठरवलं होतं. पण अजितदादांनी आम्हाला काही सांगितलेले नाही. असं काही ठरलेलं हे आम्हाला माहिती नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काम हातात घेतले आहे, त्यांना पूर्णपणे सहकार्य करणे, हे आमचे कर्तव्य आहे. आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई आहेत, त्यांच्याशी बोलावे, त्या ठरवतील, असेही मंत्री भुजबळ यावेळी म्हणाले.

विमान प्रवासाचा सांगितला थरारक अनुभव

यावेळी भुजबळ यांनी आपल्या सोबत घडलेल्या विमान प्रवासाचा थरारक अनुभव देखील सांगितला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होते. त्यासाठी धुळ्यावरून शिर्डीला विमानाने यायचे होते. ज्यावेळी आम्ही विमानात सगळे बसलो आणि विमानाची दोन्ही इंजिन सुरू झाले, धावपट्टीवर जाऊन उड्डाण घेणार त्याचवेळी डॅशबोर्ड दोन्ही स्क्रीन बंद झाल्या. मध्येच बंद झाले असते तर लँडिंगला प्रॉब्लेम आला असता. त्यामुळे ताबडतोब उड्डाण रद्द केले. तुमच्या इंजिनियरला बोलून काय असेल ते करा तोपर्यंत तुम्ही थांबा. असं सांगून त्यानंतर आम्ही गाडीने येवल्याला पोहचलो. इंजिनमध्ये काही वेळा असे काही प्रॉब्लेम होतात, असेही त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : “आता आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार, त्यांच्याशी …”;...

0
नाशिक | Nashik राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे २८ जानेवारी रोजी बारामती (Baramati) येथे विमान अपघातात निधन झाले होते. त्यामुळे राज्यभर शोककळा...